लुधीयानाच्या रस्त्यावर मंगळवारी आनोखा प्रकार पाहायाला मिळाला. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या गाडीच्या अनेक तांत्रिक समस्यांना वैतागून चालकाने चक्क गाढवांच्या मदतीने आपली गाडी ओढत नेली. गाढवांच्या गळ्यात कंपनीचे नाव उडकवून अनोखे निदर्षन केले. लुधीयाना येथे राहणा-या या कार चालकाने २०१५ मध्ये स्कोडा ऑक्टिव्हिया गाडी खरेदी केली होती. गाडीसाठी त्यांनी २५ लाख खर्च केले. पण दोन वर्षांत वारंवार समस्या उद्भवू लागल्या. या चालकाने अनेकदा कंपनीकडे याची तक्रार केली पण कंपनीने मात्र त्याला उडवा उडवीची उत्तरे दिली.

या कंपनीकडे गाडीच्या समस्यांबद्दल वारंवार तक्रारी करूनही त्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने केला आहे. टेस्ट ड्राईव्हच्या वेळी कोणत्याही अडचणी नव्हत्या मात्र गाडी खरेदी केल्यानंतर अनेक समस्या समोर येऊ लागल्या. जिथून गाडी खरेदी केली तिथून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने डिलर, एरिया मॅनेजर सगळ्यांपाशी तक्रार केल्या. अगदी जर्मनीत देखील इमेलद्वारे संपर्क साधला पण त्याच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. शेवटी त्याने अनोख्या पद्धतीने निदर्षने केली. त्याने गाढवाच्या मदतीने आपली गाडी रस्त्यावरून ओढत नेली. आता तरी कंपनी आपली दखल घेईल एवढीच त्याची आशा आहे.

Story img Loader