Lunar eclipse 2020 : येत्या ५ जून २०२० रोजी यंदाच्या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण लागणार आहे. २०२० वर्षात एकूण ६ ग्रहण लागणार आहेत. त्यात २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणाचा समावेश आहे. १० जानेवारी रोजी वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण झालं. त्यानंतर आता ५ जून रोजी दुसरं चंद्र ग्रहण होणार आहे. यंदाचे इतर चंद्रग्रहण ५ जुलै आणि ३० नोव्हेंबर रोजी दिसणार आहेत. २१ जून आणि १४ डिसेंबर रोजी सुर्यग्रहण होणार आहे.

५ जून रोजी असणारे चंद्रग्रहण छायाकल्प किंवा मांद्य प्रकारचे असेल. ग्रहणाच्यावेळी चंद्र लालसर तांबूस दिसतो. पाच जून रोजी रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरूवात होईल आणि सहा जून रोजी सकाळी दोन वाजून ३२ मिनिटांनी ग्रहण संपेल. रात्री १ वाजून ५४ मिनिटाला ग्रहणा पुर्ण प्रभावी होईल. हे ग्रहण तीन तास १५ मिनिटांचा आहे. जूनमध्येच या वर्षातील तिसरे ग्रहण आणि पहिले वर्षातील पिहले सुर्यग्रहण आहे. २१ जून रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होईल. तर दुपारी दोन वाजून दोन मिनिटांनी ग्रहण संपेल.

कसे पाहाल चंद्रग्रहण –
चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते. या वेळी पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी होणार असल्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. पण, ग्रहण साध्या डोळ्याने फारसे चांगले दिसणार नाही. परंतु मोठी द्विनेत्री अर्थात दुर्बिणी किंवा किंवा टेलिस्कोपने पृथ्वीची सावली पाहता येऊ शकेल. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण घडते, पण छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही.

मांद्य चंद्रग्रहण –
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही एक नाव आहे

वर्षातील चंद्रग्रहण कधी –
पहिलं : १०-११ जानेवारी
दुसरं : ५-६ जून
तिसरं : ४-५ जुलै
चौथं : २९-३० नोव्हेंबर

वर्षातील सुर्यग्रहण कधी –
पहिलं : २१ जून
दुसरं : १४ डिसेंबर

Story img Loader