Viral Video : लुंगी डान्स हा शब्द ऐकला तर चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील शाहरुखने केलेला डान्स आठवतो. पण, शाहरुख खानला मागे टाकणाऱ्या एका काकांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
काकांनी केलेला लुंगी डान्स सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल. व्हायरल व्हिडीओमध्ये लुंगीचा वापर करून हे काका स्टेजवर तुफान डान्स करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाचा आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, हे काका स्टेजवर लुंगी डान्स करताना दिसत आहे. हातात लुंगी पकडून काका डान्स करत आहेत. या काकांच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
काकांची ऊर्जा पाहून डान्स करावा असे तुम्हालाही वाटू शकते. हा डान्स पाहून स्टेजवरील लोकं अवाक् झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

हेही वाचा : ‘कावला’ गाण्यावर आजीचा जबरदस्त डान्स! तमन्ना भाटियालाही टाकले मागे; ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल थक्क

raghesh_magik_frame या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “काय ऊर्जा आहे, यांचा डान्स पाहून मी थक्क झालो”; तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान, खूप दिवसानंतर इतका सुंदर डान्स पाहिला” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडे शब्द नाही.”

Story img Loader