आजकाल बरेच लोक सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओंमुळे सुपरहिट होत आहेत. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालमधील राणाघाट स्टेशनवर लता मंगेशरकर यांचं गाणं गाणारी रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली. त्यानंतर आता चार वर्षाच्या गानकोकीळेचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने सुद्धा या चिमुरडीचा व्हिडीओ शेअर केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमधील लहान मुलीची व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपल्या गोड आवाजानं अवघ्या नेकऱ्यांना वेड लावणाऱ्या मुलीचं नाव प्रज्ञा मेधा असं असून ती यापूर्वी सुद्धा अवघ्या दोन वर्षाची असताना लोकप्रिय झाली होती. ती दोन वर्षाची असताना भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिचा गोड आवाज आणि चेहऱ्यावर हावभाव इतके निरागस आहेत की सर्वजण तिच्या आवाजाचे दिवाने झाले आहेत. अवघ्या काही वेळातच ही मुलगी सोशल मीडिया स्टार बनली. त्यानंतर तिचे वेगवेगळ्या गाणे गातानाचे व्हिडीओ सोशल मीडिया शेअर होऊ लागले.

आपल्या गोड आवाज आणि निरागस हावभावाने लाखो मनांवर राज्य करणाऱ्या चार वर्षाच्या गानकोकीळाने आणखी एक नवा व्हिडीओ समोर आलाय. या नव्या व्हिडीओमध्ये ती ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ हे गाणं गाताना दिसून येत आहे. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘आ गले लग जा’ चित्रपटातलं हे गाणं आहे. या नव्या व्हिडीओमुळे प्रज्ञा मेधा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. गाण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळेल याची कोणी कधी कल्पनादेखील केली नसेल. मात्र, प्रज्ञाला ओळखत नाही, असा एकही नेटकरी तुम्हाला सापडणार नाही.

चार वर्षाची गानकोकीळा प्रज्ञाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने तिच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. ‘खूपच प्रेमळ आणि सुरेल’ अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलाय. प्रज्ञा मेधाचं हे नवं गाणं नेटकऱ्यांच्या खूपच पसंतीस पडत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने प्रज्ञा मेधाचा हा व्हिडीओ शेअर करून काही तास उलटले नाहीत तर बघता बघता या व्हिडीओला आतापर्यंत साडे सात हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओवर वेगवेगळे कमेंट्स देत प्रज्ञाच्या गोड आवाजाचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit share four year old girl sing song tera mujhse hai pehla ka nata koi viral named pradnya medha