Viral video: लग्नसराई सुरू आहे, हॉल, मैदाने पुढेच काही महिने बुक आहेत. हॉल भाडे, डेकोरेशन सेट, जेवण, फोटोग्राफी, दागिन्यांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. अहेराच्या पैशातून बराचसा खर्च निघून जाईल या भरवशावर अनेकजण बजेट वाढवत आहेत. पण हे सर्व करताना थोडी सावधगिरी बाळगा, अन्यथा आनंदावर विरजण पडू शकते. लग्नसोहळ्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या परराज्यातील अनेक टोळ्या सध्या ठाण मांडून बसल्याची शक्यता आहे. या टोळ्यांतील लहान मुले आणि महिलांची तुमच्या लग्नसमारंभावर नजर असू शकते. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे, त्यामध्ये चोरट्यांनी लग्नाच्या हॉलमधून चक्क १० लाख रुपये रोख आणि दागिने लंपास केले आहे. याचा सीसीटिव्ही व्हिडीओही व्हायरल होत आहे. त्यामुळे शुभमंगल सुरू असताना जरा सावधान!
ही घटना मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील असल्याचं बोललं जात आहे. चोरट्यांनी या लग्न समारंभात एकदम पॉश कपडे घालून हजेरी लावल्याने कोणालाही संशय आला नाही. परंतू सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडीओत दिसत असलेल्या व्यक्तीने थोडा वेळ इकडे तिकडे पाहिलं आणि मग सोफ्याजवळ गेला. त्याने अगदी सहज सोफ्यावरून बॅग उचलली आणि तिथून निघून गेला. यावेळी त्या व्यक्तीच्या मागे अनेक लोक बसले होते. मात्र ही घटना कोणी पाहिली नाही. जी पिशवी घेऊन हा व्यक्ती पळून गेला त्यात दहा लाख रुपये रोख आणि दागिने होते. कुटुंबीयांनी बॅगचा शोध सुरू केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> स्मार्ट चोर! सर्वांच्या डोळ्यादेखत असा उडवला iPhone; चोरीची पद्धत पाहून अवाक व्हाल, VIDEO VIRAL
बॅगचा शोध घेतला असता ती सोफ्यावर नसल्याचे पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. हा संपूर्ण प्रकार कुटुंबाच्या लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झाले होते. गोंधळानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. हा व्हिडीओ पाहू लोक अवाक् झाले आहेत तसेच लोक टीकाही करत आहे. एवढं मौल्यवान सामान अशाप्रकारे ठेवणं चुकीचं आहे अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.