मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एक कॅफे आगीत जळून खाक झाला. जेव्हा मालकाने या प्रकारणाची तपासणी केली तेव्हा समजले कॅफेमध्ये आग लागली नाही तर लावण्यात आली आहे. सीसीटिव्हीमध्ये एक वृद्ध व्यक्तीने कॅफेमध्ये आग लावताना दिसत आहे जेव्हा त्याला आग लावण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने धक्कादायक उत्तर दिले.
इंदौरच्या लसूडिया परिसरातील स्काय कॉर्पोरेटजवळ उपस्थित कॅफेमध्ये सोमवार मंगळवारी रात्री आग लागली होती. आगीमध्ये संपूर्ण कॅफे जळून खाक झाला. कॅफेमध्ये मालिक शुभम चौधरी याने सांगितले की, ३ ते ४ लाख रुपयांचे सामान जळाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जेव्हा कॅफे शुभम चौधरीने परिसरातील आसपासचे सीसीटीव्ही पाहायला सुरुवात केली तेव्हा एक वृद्ध व्यक्ती आग लावताना दिसला.
वृद्धाने आग लावण्याचे सांगितले धक्कादायक कारण
पोलिसांनी जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी वृद्धाला लगेच अटक केली. चौकशी केल्यानंतर वृद्धाने सांगितले की, तिथे काही तरुणी सर्रास सिगारेट पितात. त्याला ते आजिबत आवडत नव्हते. कित्येक दिवसांपासून हा वृद्ध कॅफेभोवती फिरत होतो आणि तरुणींना सिगारेट ओढताना पाहत होता. त्यामुळे त्याच्या मनात राग होता. रागाच्या भरात त्याने थेट कॅफे पेटवून दिला. पोलिसांनी वृद्धाला अटक केली आहे.
कॅफेमध्ये आग लावण्याऱ्या आरोपी वृद्धाचे नाव विजन माठे आहे ज्याचे वय ७० वर्ष आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केली आहे आणि भारतीय दंड कलम ४३७ अंतर्गत तक्रार नोंदवली आहे. वृद्धाने सांगितले की, तरुण पिढीला सुधारण्यासाठी त्यांना हाच मार्ग समजतो. वृद्धाने सांगितले की, ते पाच लाख रुपये देऊ शकतात ज्यामुळे कॅफे मालकाची नुकसान भरपाई होईल.
हेही वाचा – तांब्याच्या बाटलीतून पाणी पिताय का? जाणून घ्या कशी करावी साफ, पाहा Viral Video
पोलिसांनी सांगितले की, वृद्ध असंबध गोष्टी सांगत होता. त्याच्या मते, तो नुकसान भरपाई करण्यास तयार आहे. पोलिसांनी या वृद्धाची चौकशी करत आहे. दरम्यान ही घटना सध्या खूप चर्चेत आहे कारण मुलींद्वारा सिगारेट पिण्याचे दृश्य साधारण सर्वच शहरात पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे वृद्ध कित्येक दिवसांपासून कॅफेच्या आसपास फिक होतो आणि त्याने ग्राहकांबाबत अनेकदा तक्रार केली होते पण वृद्ध असल्यामुळे त्याला कोणीही काही बोलले नाही.