सध्या विचित्र प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ विचित्र असला तरी तुमचं मनोरंजन करणारा आहे. अनेकदा असं होतं की आपण एखाद्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्या हवं तसं मिळत नाही. मग आपली चिडचिड होते आणि तिथून निघून दुसरीकडे शोधाशोध करू लागतो. पण एका व्यक्तीने तर याहूनही काही विचित्र केलंय. दुकानदाराने समोसाबरोबर डिश आणि चमचे दिले नाहीत म्हणून थेट त्याने राज्यातील सर्वात मोठी हेल्पलाइन सीएम हेल्पलाइनवर तक्रार केली. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? जाणून घेऊया नेमकं काय आहे हे प्रकरण….
हे प्रकरण मध्य प्रदेशातील बुंदलेखंडमधील छतरपूरचे आहे. बसस्थानकावर असलेल्या राकेश समोसा नावाच्या दुकानात हा व्यक्ती गेला होता. तिथे त्याला समोसाबरोबर डिश आणि चमचा न दिल्याने व्यक्ती संतापला. त्याने थेट १८१ वर डायल करून तक्रार केली. हे प्रकरण ३० ऑगस्ट रोजीचं आहे. वंश बहादूर असं या व्यक्तींचं नाव आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने भररस्त्यात कारला अडवलं आणि मग जे केलं ते पाहा…
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, वंश बहादूर नावाच्या व्यक्तीने कॉलवर दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “छतरपूर बसस्थानकावर राकेश समोसा नावाचे दुकान आहे. इथे जो समोसा पॅक करून घेताना त्याला एक चमचा किंवा डिश दिलेली नाही. कृपया समस्या लवकरात लवकर सोडवा.”
आणखी वाचा : थेट घराच्या छतावर कोसळली वीज, घटनेचा VIDEO कॅमेरात कैद
समोसा दुकानाच्या संचालकांकडू प्रतिक्रिया आली की, जेव्हा या व्यक्तीने समोसाबरोबर डिश आणि चमचा मागितला असेल, त्यावेळी कदाचित डिश आणि चमचे संपले असतील, त्यामुळेच त्याला दिले नसतील. मात्र, हे प्रकरण रंजक असल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सीएम हेल्पलाइनमध्येही ही विचित्र तक्रार स्वीकारण्यात आली.
आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल
सीएम हेल्पलाइनवर अशा विचित्र केसेस येत असतात. यापूर्वी एक विचित्र प्रकरण समोर आले होते. एक भटका बैल लोकांसाठी संकट बनला होता. शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस शहरात या बैलाने दहशत निर्माण केली होती, हा बैल लोकांच्या घरात घुसून लोकांच्या जीवाला धोका निर्माण करत होता. परिस्थिती अशी झाली होती की, ना नगर पंचायत लोकांची सुटका करू शकली ना हे लोकच बैलाला हुसकावून लावू शकले. सरतेशेवटी या बैलापासून सुटका व्हावी, यासाठी शहरातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या सीएम हेल्पलाइन १८१ वर संपर्क साधून या समस्येचे निवारण करण्याची मागणी केली होती.