Viral photo: सध्या लग्नासाठी तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणं ही जणू एक जागतिक समस्याच झाली आहे. कमी होत असलेला मुलींचा जन्मदर, मुली आणि कुटुंबीयांच्या वाढत्या अपेक्षा, यासारख्या अनेक कारणांमुळे लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक मुलं करत असल्याचं पाहायला मिळतं. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणाऱ्या एका तीस वर्षांच्या तरुणासोबत घडला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगी मिळण्यासाठी तरुणानं अशी आयडीया वापरलीय की बघून तुम्हीही अवाक् व्हाल. दीपेंद्र राठोड असे या तीस वर्षीय तरुणाचं नावं असून त्याचं लग्न झालेले नाही. दीपेंद्र राठोड ई-रिक्षा चालवतो. लग्न जमत नसल्यामुळे त्यांने त्याच्या ई-रिक्षात एक मोठे होर्डिंग लावलं आहे, ज्यामध्ये त्याने त्याची संपूर्ण माहिती दिली आहे. या होर्डिंगवर त्याचे शिक्षण, उंची, रक्तगट अशी सर्व माहिती दिली असून शहरभर तो या रिक्षातून फिरत असतो. दीपेंद्रला लग्न करायचं आहे, मात्र अद्याप त्याच्यासाठी कोणतही स्थळ आलेलं नाही. त्यामुळे त्याला असं करण भाग पडलं आहे, असं तो सांगतो. हे तर आहेच पण होर्डिंगवर त्यांनं एक खास गोष्ट लिहिली आहे, लग्न करताना जात-धर्माचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही जाती-धर्माची मुलगी किंवा तिचे नातेवाईक त्याच्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन येऊ शकतात.
मुलींची संख्या कमी, अपेक्षा जास्त
दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत असल्याने समाजात लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. अशातच मुलींचा व त्यांच्या आई-वडिलांचा कल नोकरी व शहरात असलेल्या तरुणांकडे जास्त झाला आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलांना मुली नाकारत आहेत. त्यांची लग्न होत नाही. बेरोजगार व खेड्यात राहणाऱ्या तरुणांना या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
हेही वाचा >> प्रसिद्धीसाठी काहीही! रिलसाठी तरुणी उंच इमारतीवरुन खाली लटकली; हृदयाचा ठोका चुकवणारा Video व्हायरल
शेतकरी नवरा का नको गं बाई?
शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. मुलींना नोकरीवालाच नवरा पाहिजे असतो. ग्रामीण भागात राहणार शेतकरी नवरा म्हणून नको असतो. मग हा शेतकरी किती समुद्ध असला, निर्व्यसनी असला तरी त्याला वधूपिता सुद्धा जावाई म्हणून त्याचा स्वीकार करत नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मुलांची लग्न होत नाही. त्यांचे वय वाढत आहे. पण लग्न होत नाही. शिक्षण आहे, शेती आहे, पैसा आहे, सर्व काही असताना लग्न होत नसल्यामुळे तरुण आत्महत्येसारखंही पाऊल उचलताना दिसतात.