सध्या लग्नसराई सुरु आहे. सोशल मीडियावर नवरा-नवरीचे (Bride-Groom) हटके फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. तर काही हटके फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होत असतात. असाच एक हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नवरीनं लग्नमंडपात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नवरीच्या अनोख्या स्वॅगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये नवरी थेट ट्रक्टरवर बसूनच लग्नमंडपात एन्ट्री घेत असल्याचं दिसून येत आहे. हे पाहून वऱ्हाडी मंडळी फक्त बघतच राहिले. इतकंच काय तर उद्योगपती आनंद महिंद्राही नवरीच्या स्वॅगचे चाहते झाले आहेत. विशेष म्हणजे नवरी चालवत आलेली ट्रॅक्टर आनंद महिंद्रा कंपनीची होती.

सोशल मीडियावर या फिल्मी नवरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली नवरी मध्यप्रदेशमधल्या बेतुल जिल्ह्यातल्या जावरा गावची असल्याचं सांगण्यात येतंय. या नवरीबाईचं नाव भारती तागडे असं आहे. गेल्या आठवड्यातच तिलं लग्न झालं. लग्नात काहीतरी हटके करायचं म्हणून या नवरीने चक्क ट्रॅक्टरवरूनच लग्नमंडपात एन्ट्री केलीय. नववधूच्या वेशभूषेत अगदी सजून धजून, डोळ्यांवर काळा चष्मा घालून ही नवरी जेव्हा लग्नमंडपात आली तेव्हा तिथे असलेले सर्व वऱ्हाडी मंडळी तिच्याकडे एकटक पाहतच राहिले.

आणखी वाचा : अपने गली में कुत्ता शेर! कुत्र्याचा थेट जंगलाचा राजा सिंहावरच हल्ला, पाहा हा VIRAL VIDEO

भारतीने सांगितले की, लग्नात गाडी आणि डोलीतून एन्ट्री घेण्याचा ट्रेंड जुना झाला आहे. त्यामुळे ती स्वतः ट्रॅक्टर चालवत पॅव्हेलियनमध्ये एन्ट्री करावी असं तिला वाटत होतं. भारती घरून तयार झाली आणि ट्रॅक्टरवर स्वार होऊन ट्रॅक्टर चालवत लग्नाच्या मंडपात पोहोचली. ग्रामीण भागात ट्रॅक्टर सहज उपलब्ध होत असल्याचे तिने सांगितले. या नवरीला ट्रॅक्टर कसा चालवायचा हे देखील माहित आहे. त्यामुळे तिने ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात एन्ट्री घेण्याचे ठरवले.

आणखी वााचा : लग्नाचा केक कापणार तेव्हढ्यात नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही की… पाहा हा VIRAL VIDEO

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. आनंद महिंद्रा क्लिप शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, “नवरीचे नाव ‘भारती’ असून ती ‘स्वराज’ चालवत आहे. हे महिंद्रा राइज ब्रँडवर हे खू दृश्य फारच चांगले दिसते.” स्वराज हा महिंद्राचा मुख्य ट्रॅक्टर ब्रँड आहे आणि तो भारताच्या प्रत्येक भागात लोकप्रिय आहे. भारतात सगळ्यात जास्त विक्रीला जाणारा हा ट्रॅक्टर ब्रॅण्ड आहे.

Story img Loader