Singrauli CCTV Viral Video: अजय देवगणचा सिंघम चित्रपट अनेकांना आठवत असेल. या चित्रपटात पुढारी महेश मांजरेकर अजय देवगणला गणवेश उतरविण्याची धमकी देतात. त्यानंतर देवगण स्वतःहूनच गणवेष उतरवून अन्यायाच्या विरोधात उभा ठाकतो. अशाच प्रकारचा खराखुरा प्रसंग मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात घडला आहे. भाजपाच्या एका नेत्याने पोलिसाला त्याची गणवेष उतरविण्याची धमकी दिल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या हातानंच अंगावरील गणवेष काढला. या घटनेचं सीसीटीव्ही चित्रण व्हायरल झाल्यानंतर आता मध्य प्रदेश पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सदर व्हिडीओमधील प्रकरण आठ महिन्यांपूर्वी घडलं असून आता व्हिडीओ व्हायरल कुणी केला? याची चौकशी केली जाणार आहे.

काँग्रेसने या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पोलीस ठाण्यात भाजपाचे पुढारी आणि काही अधिकारी बैठकीसाठी एकत्र बसल्याचे दिसतात. दी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार बैठकीत भाजपाच्या नेत्यानं सहायक पोलीस उपनिरीक्षकाला त्याची गणवेष उतरविण्याची धमकी दिली. यानंतर चिडलेल्या पोलिसानं स्वतःच्या हातानं रागारागात अंगावरील गणवेष उतरविला.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…

या घटनेचा व्हिडीओ आता समोर आल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, सदर घटना आठ महिन्यांपूर्वी सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात घडली होती. व्हिडीओमध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक तावातावात आपल्या खुर्चीवरून उठत गणवेष उतरविणा दिसत आहे. यावेळी उपस्थित काही लोक त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात. पण पोलीस अधिकारी कुणालाही न जुमानता गणवेष तिथेच उतरवितात.

हे वाचा >> ‘पुष्पा 2’ ते ‘सिंघम अगेन’, बॉलिवूड आणि साऊथचे ‘हे’ मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर देणार टक्कर; पाहा संपूर्ण यादी

पोलिसांनी पुढे म्हटले की, कोतवाली परिसरात एका नाल्याच्या कामादरम्यान संबंधित पोलीस अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांचा वाद झाला. या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे नेते, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यात बसले होते. मात्र भाजपाच्या नेत्यानं धमकी दिल्यानंतर प्रकरण चिघळलं.

मध्य प्रदेश काँग्रेसने एक्सवर व्हिडीओसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले की, राज्यातील पोलिसांची किंमत शून्य झाली आहे. गुन्हेगारी अनियंत्रित झाली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. त्यामुळेच पोलीस काही ठिकाणी दबावात आहे. तर काही वेळा ते लाचार होऊन काम करत आहेत. या व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे भाजपाच्या नेत्याने पोलिसाला इतका मनस्ताप दिला की, त्याने सर्वांसमोरच आपला गणवेष फाडून टाकला. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे गृहविभाग असून त्यांना गृहखात्यावर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. जर पोलीसच वैतागून स्वतःचा गणवेष फाडत असेल तर मग जनतेला न्याय कसा मिळेल?

दरम्यान पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता म्हणाल्या की, आम्ही गणवेष फाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. हा आठ महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ आहे. स्थानिक जमिनीच्या प्रकरणात दोन गटात वाद होता, त्यातून संबंधित पोलिसाने गणवेषाचा अवमान केला. त्याबद्दल त्याला शिक्षा दिलेली आहे. जर पोलिसच गणवेषाचा आदर ठेवणार नसतील तर मग इतर कसा आदर ठेवतील? असा सवाल गुप्ता यांनी उपस्थित केला.

तसेच हा व्हिडीओ आता कुणी व्हायरल केला? यामागे काही विशिष्ट उद्देश आहे का? याचाही तपास केला जाणार असल्याचे निवेदिता गुप्ता म्हणाल्या.