Viral video: आदिमाया अंबाबाई.. साऱ्या दुनियेची आई…! खरंच ती अवघ्या विश्वाची आई आहे, आणि आई आपल्या घरी येणार तर तिचं स्वागतही खासंच असायला हवं. तसेच देवीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशनही केलं जातं. अशाच एका मंडळानं देवीसाठी आगळी वेगळी आरास केली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने देशभरात देवीच्या मंदिरांना अनेक प्रकारे आकर्षक पद्धतीनं सजवलं जात आहे. त्यामध्ये विविध फुलांचा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातोय. मात्र इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे डेकोरेशन करण्यासाठी मंडळानं पैसे खर्च केले नाहीत तर उलट पैशांचंच डेकोरेशन केलंय. थोडं थोडकं नाहीतर देवीसाठी ५१ लाख रुपयांचं हे डेकोरेशन केलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर येथील हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी डेकोरेशनला फुलांऐवजी ५०० रुपयांच्या नोटांपासून बनवले हार यावेळी देवीला घातले आहेत. केवळ देवीचा मखरच नाही तर मंदिरातल्या भिंतींवरही नोटांची सजावट करण्यात आलेय. २०००, ५००, २००, १०० च्या नोटांची फुलं बनवून ते देवीला अर्पण करण्यात आलंय. या सजावटीची आता चांगलीच चर्चा सुरू आहे.

तुम्हाला हे पटतंय का?

या नोटांच्या माध्यमातून देवीच्या मंदिरातील फुलांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच गाभाऱ्यातील भिंतीवरही नोटांच्या माध्यमातून अनेक आकर्षक गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या भव्यतेमध्ये अधिक भर पडल्याचं दिसून येतंय. देवीच्या मंदिराची सजावट करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा वापर केला जातोय. त्यामुळे या मंदिरांची सजावट पाहून अनेकांचे डोळे फिरले आहेत हे नक्की. तर काहीजण यावर टीकाही करत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा तुम्हाला हे पटतंय का?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आज की रात मजा हुस्न का” गाण्यावर तरुणाचा खतरनाक डान्स पाहून गर्लफ्रेंडही हात सोडून पळाली; VIDEO एकदा पाहाच

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, नेटकरी भडकले

@Gulzar_sahab नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “हा तोच देश आहे जो ८१ कोटी लोकांना मोफत रेशन देतो” तर आणखी एकानं “यापेक्षा गरिबाला मदत करा” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही नेटकरी यावर भडकले असून या डेकोरेशनवरच टीका केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradeshs durga mata pandal uses real 500 rupee notes for decoration worth 51 lakh rupees video viral srk