दरवर्षीचा उन्हाळा हा देशात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही देशाच्या अनेक राज्यात पाणीटंचाई आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागले आहेत. मध्यप्रदेशमध्ये तर ही परिस्थिती इतकी भीषण आहे की इथल्या महिलांना घोटभर पाण्यासाठी खोल विहिरीत उतरावं लागतंय. परिसरातील विहिरी, तलाव आटले असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी या महिलांना विहिरीत उतरून जीवघेणी कसरत करताना पाहून मनात धडकी भरू लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्यप्रदेशमधल्या डिंडौरी परिसरातला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पाणीटंचाईचे एक भीषण चित्र या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलंय. या भागात उन्हाळा सुरू होताच इथल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होते. घरात पाणी नाही…पाणी येतं ते पिण्यापुरतं. मग तहान भागवण्यासाठी या भागातल्या महिला हंडा कळशी घेऊन खोल विहिरीत उतरतात. विहिरी उपलब्ध असलेलं पाणी घऊन त्या जीव टांगणीला ठेवून पुन्ह वर येतात. ही परिस्थती एवढी भयंकर असते की खोल विहिरीत चढताना किंवा उतरताना केव्हाही अपघात होऊ शकतो. परंतु त्याचा विचार केला तर पाणी मिळेल कसे.? त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून इथल्या महिला विहिरीत उतरतात ते फक्त पाण्यासाठीच. अंगावर शहारे आणणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : खाली डोकं, वर पाय! हत्तीचा स्तब्ध करणारा स्टंट; VIRAL VIDEO पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरे देवा! मुलाला स्विमिंग शिकवत होती, अन् स्वतःचंच हसं करून घेतलं, पाहा हा VIRAL VIDEO

या गावातील काही महिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले, “सरकारी अधिकारी आणि नेते फक्त निवडणुकीच्या वेळी येतात. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था होईपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असा निर्धार यावेळी केला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पतीने बाईकवर लिहिला असा संदेश जो वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही!

पिण्याचे पाणी आणण्यासाठी खोल विहिरीत उतरावे लागत असल्याचे या महिलांनी सांगितले. महिलांनी सांगितले, “त्यांच्या गावात तीन विहिरी असून, तीनही जवळपास कोरड्या पडल्या आहेत.” त्यांच्या गावात एकाही हातपंपावर पाणी नाही, असं देखील महिलांनी सांगितले.