मगरीचं साधं नाव जरी ऐकलं की लोकांच्या अंगावर काटा येतोच. कारण एकदा कोणी मगरीच्या तावडीत सापडलं की त्याची सुटका होणं अशक्यच असतं. त्यामुळे ज्या नद्या आणि तलावांमध्ये मगरींचा वावर असतो अशी ठिकाणांपासून लोक दूर राहतात. कधीकधी महाकाय मगरी शिकार करण्यासाठी पाण्यातून बाहेर सुद्धा येत असतात. मगरींच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मगर अगदी हुशारीने एका फटक्यात कशी शिकार करते हे आपल्याला माहितीच आहेत. त्यात त्या मगरी भुकेल्या असतील आणि आपण त्यांच्यासमोर गेलो तर मग काही खरं नाही. पण सध्या मगरीच्या एका व्हिडीओने साऱ्यांनाच हैराण करून सोडलंय. या व्हिडीओमध्ये महाकाय मगरीला जवळ येत असल्याचं पाहून महिला घाबरली नाही तर मगरीला पळवून लावलंय. तुम्हाला विश्वास नसेल होत तर हा व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुरूवातीला हैराण तर व्हालच पण महिलेने ज्या पद्धतीने मगरीला घाबरवून पळवून लावलंय, ते पाहून मात्र तुम्हाला हसू आवरता येणार नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करोडो लोकांनी पाहिलाय. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला तिच्या कुत्र्यासह नदीच्या काठावर उभी असते. त्याचवेळी नदीतून एक महाकाय मगर हळूहळू या महिलेच्या जवळ येताना दिसून येतेय. मगरीला पाहून नदीतल्या एका माश्याने सुद्धा पळ काढलेला दिसून येतोय. ही मगर महिलेच्या जवळ जाऊन तिला शिकार करते की काय असा विचार मनात येऊ लागतो. पण धक्कादायक म्हणजे या महाकाय मगरीला आपल्या जवळ येताना पाहून सुद्धा ही महिला घाबरली नाही. तिची हालचाल पाहून मगरीला जवळ येताना पाहून तिला कशाचीच भिती नसल्याचं दिसून येतंय. अगदी आरामात ही महिला महाकाय मगरीला आपल्या जवळ येत असल्याचं पाहताना दिसून येतेय. काही वेळानंतर ही महाकाय मगरी तिच्या अतिशय जवळ आली तेव्हा मात्र ही महिला थोडी डगमगली आणि यापुढे तिने जे काही केलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

या महाकाय मगरीच्या आपल्या जवळ आल्याचं पाहून ही महिला घाबरली नाही तर मगरीला घाबरून पळवून लावलं. महिलेने अगदी आरामात आपल्या पायातली चप्पल काढली आणि मगरीला चप्पल दाखवत घाबरवू लागली. काही वेळाने ही महिला महाकाय मगरीला चपलाने मारण्यालाठी पुढे देखील येताना दिसून येतेय. तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल, पण महिला चप्पलेने मारणार हे पाहून चक्क या महाकाय मगरीने धूम ठोकली. तुम्हाला विश्नास नसेल होत तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

इथे पाहा हा व्हिडीओ :

@RexChapman नावाच्या ट्विटर हॅंडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. रेक्स चॅपमॅन हा एनबीएचा माजी खेळाडू आहे. आश्चर्य करून सोडणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत १.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना विश्वास करणं अवघड होऊ लागलंय.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झालीय. काही युजर्सनी तर यावर विनोद करण्यास सुरूवात केलीय. त्याचप्रमाणे वेगवेगळे मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत. एका युजरने लिहिलंय, “चपलीची पॉवर”. दुसऱ्या युजरने लिहिलंय, “प्रत्येक आईचं जुनं हत्यार..”. आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं, “या हत्यारला आता जनावरं सुद्धा ओळखू लागले आहेत.”

Story img Loader