मॅगी आणि पाणीपुरी हे भारतातील दोन लोकप्रिय पदार्थ आहेत. तथापि, या मॅगीचा वापर एखाद्या स्ट्रीट फूडमध्ये केला जाईल असे कोणालाही वाटले नसेल. परंतु दुर्दैवाने हा प्रकार देखील सत्यात उतरला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे नेटकरी नक्कीच हैराण झाले आहेत.

हल्ली खाद्य पदार्थांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे आणि या प्रयोगांचे बहुतेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. नुकताच मॅगी-पाणीपुरीचा या ट्रेंडमध्ये समावेश झाला असून यावरील आपला रोष व्यक्त करण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियाला आपले शस्त्र बनवले आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाणीपुरीमध्ये बटाट्याच्या जागी मॅगी भरताना दिसत आहे. तसेच, डिश सर्व्ह करण्यापूर्वी तो त्यावर मसालेदार पुदिन्याचे पाणी घालताना दिसत आहे.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”

या व्हायरल फोटोमध्ये दडलाय एक इंग्रजी शब्द; तुम्ही ओळखू शकता का?

“मॅगी पाणीपुरीसह आठवड्याच्या मध्यभागी आलेल्या संकटाचा सामना करत आहे…आशा आहे की हे तुम्हाला देखील मदत करेल” असे ट्विटर वापरकर्ता मोहम्मद फ्युचरवाला यांनी बुधवारी व्हिडीओ शेअर करताना लिहिले.

बहुतेकांना, ही डिश का तयार केली गेली आहे असा प्रश्न पडला होता. तर अनेकांनी २०२० साली मॅगी-पाणीपुरीच्या व्हायरल झालेल्या फोटोची आठवण करून दिली. यानंतर अनेक वापरकर्त्यांनी हा विचित्र पदार्थ शेअर केल्याबद्दल त्या व्यक्तीची निंदा केली आणि त्याला ब्लॉक करण्याची धमकी दिली, काहींनी मजेशीरपणे सांगितले की ते ही डिश वापरण्यास तयार आहेत.

तुटलेले पाय घेऊन रस्त्यावर फिरत होता इसम; बघणाऱ्या लोकांची भीतीमुळे झाली वाईट हालत

गेल्या वर्षी, बटर चिकन पाणीपुरी विकणाऱ्या एका रेस्टॉरंटने नेटिझन्सना धक्का दिला होता. तसेच मॅगी मिल्कशेक आणि फॅन्टा मॅगी या पदार्थाचे फोटो पाहून, “आमचा आवडता पदार्थ उद्ध्वस्त झाला आहे’ अशी प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिली होती.

जर तुम्हाला वाटत असेल की मॅगीवर फक्त इतकेच प्रयोग केले आहेत, तर असेही काही महाशय आहेत ज्यांनी चटपटीत मसालेदार मॅगीला एक गोड चवीचा ट्विस्ट दिला आहे. मागील काही दिवसात, मॅगीचे लाडू आणि मॅगी खीर यासारख्या रेसिपी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या रेसिपी पाहून नेटकरी पुरते हैराण झाले होते.