Virat Kohli Viral Video: आपल्या देशात कलेची आणि कलाकारांची आजिबात कमतरता नाही. असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या कलेसाठी ओळखले जाते. अशाच एका आगळ्या वेगळ्या कलाकारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. असे अनेक कलाकार आहे जे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही खास समर्पित करतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका कलाकाराने मॅग्निफायिंग ग्लास आणि लाकडाच्या तुकड्याचा वापर करून प्रसिद्ध भारतीय क्रिकेपटू विराट कोहलीचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे. कलाकाराची कलाकारी लोक पाहून आश्चर्यचकित होत आहे.
कलाकाराने चक्क लाकूड जाळून तयार केलं Virat Kohli चित्र
इंडियन आर्टिस्ट्स क्लबच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केले आहे. या व्हिडिओला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, विराट-आर्ट फ्रॉर्म सनलाइट’ कलाकार विग्नेश द्वारे पोस्ट केला गेला होता. व्हिडिओमध्ये कलाकाराने काही अंतरावर ठेवलेल्या लाकाडाच्या फळीवर विराट कोहलीचे फोटो तयार करण्यासाठी त्याने मॅग्निफायिंग ग्लास म्हणजेच भिंगाचा वापर केला आहे. कलाकाराने भिंग वापर करून लाकडी फळीवर सुर्याच्या किरणांचा वापर केला आहे. त्याने लाकडू जाळून ही कलाकारी केली आहे. हा व्हिडिओ पाहून लोक या कलाकाराचे कौतूक करत आहे.
हेही वाचा – कोण आहे अर्पित आणि अर्पिता? #BoycottStarbucks ट्विटरवर का होतेय ट्रेंड? जाणून घ्या काय आहे प्रकरण
अशी कलाकारी तुम्ही कधीही पाहिली नसेल!
या व्हिडिओला आतापर्यंत १९ एप्रिलला शेअर केले होते. व्हिडिओला २.१ लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिजे गेले आहे.. लोक यावर प्रतिक्रिया देखील देत आहे. विराटच्या चाहते देखील सतत या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहे. आईपीएल 2023 मध्ये विराट कोहली अगदी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीचे फॅन्स कोटींमध्ये आहेत, ज त्याचे समर्थन करतात.