प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून, त्यासाठी देशातील अनेक साधू-संत आणि भाविक दाखल होतायत. एकीकडे महाकुंभ मेळा सुरू असताना दुसरीकडे त्यातील साधू, साध्वी तसेच आयआयटीयन्स बाबांची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर यासंबंधित रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना एक माळा विकणारी सुंदरीदेखील चर्चेत आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर या माळा विकणाऱ्या मुलीचे अनेक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मेळ्यात तिच्यामागे अनेक लोक सेल्फी घेण्यासाठी गर्दी करून उभे असल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसते. तर तिच्या डोळ्यांवर भाळणारे तिचे अनेक चाहते तिच्यामागे लागल्याचेही अनेक व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहे. माळा विकणाऱ्या या मुलीचे नाव मोनालिसा असे असून, आता तिला या प्रसिद्धीचा त्रास होऊ लागल्याचे दिसतेय. याचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल गर्ल मोनालिसाबरोबर नेमके काय घडलेय, ते जाणून घेऊ…

कुंभ मेळ्यातील सुंदरीला झाला त्रास

कुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या या सुंदरीला प्रसिद्धीबरोरच आता लोकांचा त्रासही सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लोकांच्या त्रासाला कंटाळून ही माळा विकणारी मुलगी त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी आपल्या कुटुंबाजवळ मदतीसाठी धावून गेली. तिला कुटुंबीयांनी आधार दिला आणि लोकांना दिसू नये म्हणून लपवण्याचा प्रयत्न केला. लोकांपासून दूर राहण्यासाठी ती गर्दीपासून थोडी लांब येत खाली बसली आणि तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर चादर टाकून तिला लपवले.

कुंभ मेळ्यातील मुलीचा व्हिडीओ @adultsociety या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल “घृणास्पद! लोकप्रियता झाली धोकादायक… महाकुंभ मोनालिसाचा जनतेकडून छळ” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला तब्बल ३.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

मोनालिसाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, हे लोकही कोणाच्या पाठी पडतात तर हात धुऊनच पडतात. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, या बेरोजगारांनी बिचारीचं जगणं कठीण करून टाकलं आहे. तर तिसऱ्याने “पाप धुवायला आले होते आणि आता स्वत: पाप करून जातायत” अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbh mela viral girl monalisa faced harassment and trouble from people hide under blanket video viral dvr