Maha Kumbha Mela 2025 Funny Video : महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देशविदेशातून साधू- संत, भाविक दाखल होत आहेत. कुंभमेळ्यात इतक्या मोठ्या संख्येने लोक पोहचले असल्याने ५०० मीटरचे अंतर कापण्यासाठी त्यांना एका तासापेक्षा अधिकचा वेळ लागतोय. अशा परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनानेही अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण, महाकुंभमेळा परिसरातील गर्दीत अनेक वृद्ध, लहान मुलं हरवत आहेत, ज्यांना आपल्या नातेवाईकांना सहज संपर्क करता यावा किंवा कॉल करता यावा यासाठी खोया-पाया नावाचं केंद्र सुरू करण्यात आले आहे, ज्याद्वारे ठिकठिकाणी लाऊड स्पीकरच्या मदतीने सतत हरवलेल्या लोकांविषयीची माहिती दिली जात आहे. पण, ही माहिती ज्या पद्धतीने दिली जात आहे, ती ऐकून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गर्दीच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की, हरवलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मदत केंद्र असते, जिथे हरवलेल्या व्यक्तीची माहिती लाऊड स्पीकरद्वारे सांगितली जाते. यामुळे हरवलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सहज पोहोचता येते. अशा पद्धतीने महाकुंभमेळ्यातही हरवलेल्यांसाठी खोया-पाया केंद्र सुरू करण्यात आले आहे, ज्याद्वारे बहुतेक लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सहज पोहोचवले जात आहे, पण त्यासाठी ज्या पद्धतीने उद्धघोषणा दिल्या जात आहेत, त्या ऐकून कोणालाही सहज हसू येईल.

महाकुंभ मेळ्यातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या लाईटिंग पोलवर दोन लाउड स्पीकर्स लावले आहेत, ज्याद्वारे एक महिला तिच्या हरवलेल्या व्यक्तीला माहिती देताना दिसतेय, पण ती ज्या पद्धतीने हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी उद्धोषणा करतेय, ते ऐकून तिथे उपस्थित असलेले लोकही हसू लागतात. ती असं म्हणतेय की, “ऐ राजू… , हम ढूंढ रहे है रे बाबू..”. हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी अशा मजेशीर पद्धतीने केलेली उद्धोषणा तुम्हीदेखील पहिल्यांदाच ऐकली असेल.

Vastu Shastra : तुमच्याही घरात बेडरूमला अटॅच्ड बाथरूम आहे का? मग वास्तुशास्त्रातील ‘हे’ नियम करा फॉलो, अन्यथा…

दरम्यान, या व्हिडीओवर आता लोकही मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, भावांनो, लोक इथे नक्की कोणकोणत्या भाषेत बोलतायत काहीच समजत नाहीये. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ‘ऐ राजेश, जिथे कुठे असशील तिथून लवकर तुझ्या आईकडे जा.’ तिसऱ्या युजरने लिहिलेय की, राजेश खूपच बेजबाबदार आहे वाटतं, आपल्या आईला विसरला.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbha mela 2025 family miss khoya paya kendra funny announcements viral video sjr