Viral Video : १३ जानेवारीपासून उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभमध्ये अनेक भाविक, भक्त, साधु, संत सहभागी होत आहे. महाकुंभमेळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका सुंदर साध्वीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. या साध्वीचे नाव होते हर्षा रिचारिया. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने स्वतःला निरंजनी आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंदगिरी जी महाराज यांची शिष्य असल्याचे सांगितले होते. पुढे जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर असल्याचे समोर आले.
महाकुंभ मेळ्यातील हर्षा रिचारियाचा लूक खूप चर्चेत आला होता. तिच्या जटा पाहून ती खरोखरच साध्वी असल्याचे लोकांना वाटले पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हर्षा बनावटी जटा लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Mahakumbh 2025 a beautiful sadhvi Harsha Richhariya again she is doing dreadlocks hairstyle video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हर्षा रिचारिया एका महिलेच्या मदतीने केसाला जटा लावताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला हर्षा रिचारियाचा पूर्वीचा लूक आणि जटा लावल्यानंतर लूक दिसून येईल. जटा परिधान करून ती महाकुंभमध्ये साधु संताना भेटताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

donald trump sensex today
Sensex Today: डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत्रं हाती घेताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स कोसळला!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ambulance
शेवटी मृत्यूने गाठलेच! महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पण रुग्णवाहिकेतील ‘या’ चुकीमुळे गेला जीव
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!
RG Kar rape-murder case verdict
RG Kar Rape-Murder Case : संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेप का झाली?
Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding First Photo
राजा राणीची गं जोडी! शिवानी सोनार व अंबर गणपुळे अडकले विवाहबंधनात, लग्नातील पहिला फोटो आला समोर
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता

पाहा व्हायरल व्हिडीओ

yash_sahu1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाकुंभाची साध्वी हर्षाने आपले बनावट जटा कसे लावले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “मान्य आहे की, हर्षाने बनावट जटा लावल्या आणि ती साध्वी सुद्धा नाही. कारण साध्वी मेकअप करत नाही पण ती करते. पण महाकुंभ प्रयागराजला ती जे कपडे परिधान करून गेली ते साध्वीचे कपडे आहेत, फक्त कपडेच नाही तर तिचा पेहरावही साध्वीसारखा आहे.अशात संत- महासंताच निषेध करणे गरजेचे होते. पण मला असे वाटते, असे होऊ नये. आता ती सनातन धर्माप्रती जागृत झाली आहे. म्हणून माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी नेहमी धर्माचे पालन करावे. आजच्या काळात सनातन धर्माला पुढे न्यायची इच्छा असलेली अशी तरुणी आहे याचा आपल्याला आनंद व्हायला हवा. जय श्री राम” तर एका युजरने लिहिलेय, “मी तुमच्याबरोबर आहे ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी हिची सुंदरता आणि डोळे पाहून चाहता झालो” काही युजर्सनी टीका केली आहे तर काही युजर्सनी तिच्या सुंदरतेचे आणि आपल्या संस्कृतीला पुढे घेऊन जाणाऱ्या तिच्या विचाराचे कौतुक केले आहे

Story img Loader