Viral Video : १३ जानेवारीपासून उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभमध्ये अनेक भाविक, भक्त, साधु, संत सहभागी होत आहे. महाकुंभमेळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका सुंदर साध्वीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. या साध्वीचे नाव होते हर्षा रिचारिया. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये तिने स्वतःला निरंजनी आखाडाचे महामंडलेश्वर स्वामी श्री कैलाशनंदगिरी जी महाराज यांची शिष्य असल्याचे सांगितले होते. पुढे जेव्हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर असल्याचे समोर आले.
महाकुंभ मेळ्यातील हर्षा रिचारियाचा लूक खूप चर्चेत आला होता. तिच्या जटा पाहून ती खरोखरच साध्वी असल्याचे लोकांना वाटले पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हर्षा बनावटी जटा लावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Mahakumbh 2025 a beautiful sadhvi Harsha Richhariya again she is doing dreadlocks hairstyle video goes viral)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा