Kumbha Mela 2025 Iitian Baba: सध्याच्या आर्थिक युगात एकीकडे लोक चांगली नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करताना दिसतात. चांगले शिक्षण घेत आयुष्यात काही तरी मोठं करण्याची मनीषा बाळगतात. पण, दुसरीकडे काही लोक सनातन धर्म स्वीकारत संन्याशाचे जीवन जगणे पसंत करतात. लाखो नोकऱ्या सोडून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली आणि आता सनातन धर्माच्या रक्षणासाठी रात्रंदिवस ते व्यस्त असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही अशा नऊ IITian संन्यासी साधूंविषयी बोलत आहोत, ज्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करत संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला. चला तर मग जाणून घेऊ IIT मधून शिक्षण घेतलेल्या नऊ साधूंविषयी, ज्यांची आता सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

महाकुंभ मेळा २०२५ मध्ये सहभागी झालेले १० आयआयटीयन्स संन्यासी (Kumbha Mela 2025 Iitian Baba)

१) संदीप कुमार भट्ट (स्वामी सुंदर गोपालदास)

आयआयटी दिल्ली सुवर्णपदक विजेते संदीप कुमार भट्ट यांनी वयाच्या २८ व्या वर्षी लाखोंची नोकरी सोडली आणि संन्यासाचा मार्ग निवडला. आता ते स्वामी सुंदर गोपालदास म्हणून आपले आध्यात्मिक जीवन जगत आहेत.

२) अभय सिंग (मसानी गोरख)

आयआयटी मुंबईतून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असलेले अभय सिंग कॅनडामधील लाखोंचा पगार असलेली नोकरी सोडून संन्यासी साधू बनले. ते भगवान शिवाचे उपासक, भक्त आहेत; आता त्यांनी आध्यात्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महाकुंभमेळ्यात त्यांचा प्रेरणादायी प्रवास आता लोकांसाठी आकर्षणाचा भाग बनत आहे.

३) अविरल जैन

अविरल जैन हे आयआयटी बीएचयू (IIT BHU) मधून संगणक विज्ञान पदवीधर आहेत, ज्यांनी २०१९ मध्ये वॉलमार्ट (अमेरिका) मधील करोडोचा पगार असलेली नोकरी सोडत आध्यात्मिक मार्ग स्वीकारला. ते जैन ऋषी विशुद्ध सागर जी महाराज यांचे शिष्य आहेत, ते सध्या आत्मज्ञानाच्या शोधात कठोर तप करत आहेत.

४) संकेत पारीख

आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले संकेत पारीख यांनीदेखील अमेरिकेतील उच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. धर्मावर श्रद्धा नसतानाही त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी जैन साधू होण्याचा निर्णय घेतला. आचार्य युगभूषण सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करत आहेत.

५) आचार्य प्रशांत

आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, आचार्य प्रशांत यांनीही संन्यासी साधू होण्याचा निर्णय घेतला. आचार्य प्रशांत हे पूर्वी एक आयएएस अधिकारीदेखील होते, पण आता ते संन्यासी बनून “अद्वैत जीवन शिक्षण”द्वारे समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. ते आपल्या प्रवचनातून आणि आध्यात्मिक ग्रंथांद्वारे लाखो लोकांचे जीवन जागृत करत आहेत.

६) महान एमजे (स्वामी विद्यानाथ नंदा)

आयआयटी कानपूर आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या महान एमजे यांनी २००८ मध्ये रामकृष्ण मठाचा भाग बनून संन्यासाचा मार्ग निवडला. ते गणिताचे प्राध्यापकही आहेत आणि आता आध्यात्मिक ज्ञानाद्वारे लोकांना जीवनाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहेत.

७) गौरांग दास

गौरांग दास हे आयआयटी बॉम्बेचे केमिकल इंजिनिअरिंग पदवीधर, इस्कॉनशी संबंधित प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते अध्यात्म आणि वैज्ञानिक विचार यांची सांगड घालून जीवनातील समस्यांवरचे उपाय सांगतात.

८) स्वामी मुकुंदानंद

आयआयटी मद्रास आणि आयआयएम कोलकातामधील पदवीधर स्वामी मुकुंदानंद यांनी योग आणि ध्यानाचा प्रचार करण्यासाठी “जगद्गुरु कृपालुजी योग”ची स्थापना केली. त्यांनी आपले कॉर्पोरेट करिअर सोडून आपल्या आत्म्याचे ऐकण्याचे ठरवले आणि आता ते लोकांना संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात.

९) रसनाथ दास

आयआयटी दिल्ली आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या रसनाथ दास यांनी इस्कॉनमध्ये सामील होऊन आध्यात्मिक जीवन स्वीकारले. ते “अपबिल्ड” नावाच्या संस्थेद्वारे लोकांमध्ये नेतृत्व आणि आत्म-जागरूकता वाढवण्याचे काम करतात.

१०) राधेश्याम दास

आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर राधेश्याम दास यांनी १९९७ पासून आध्यात्मिक जागृकता केंद्राचे नेतृत्व करण्यासाठी आपले पुढचे आयुष्य घालवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh 2025 hightlights 10 iit graduates who chose spirituality over high paying jobs iitians who became a monk sjr