Emotional video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. नवरा-बायकोचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं असं म्हणतात. दोघंही एकमेकांशी यथेच्च भांडतात पण प्रतिकूल परिस्थितीत ते दोघंच एकमेंकाना साथ देतात. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात जर एक पार्टनर स्वर्गवासी झाला तर दुसऱ्याला जगणं कठीण होऊन जातं. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बायकोच्या मृत्यूनंतर तिच्या प्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी काय केलंय पाहा. हा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील. खरंच प्रेम असावं तर असं

कुंभ मेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे या कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून, जगभरातील ४० कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आयला आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील एका आजोबांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

झालं असं की कुंभमेळ्यात आलेल्या आजोबांची बायको स्वर्गवासी झाली आहे. मात्र त्यांचं आपलं बायकोवर खूप प्रेम होतं. त्यामुळे तिची आठवण येत असताना या आजोबांनी वाळूत बायकोचं चित्र काढलंय. यावेळी त्यांचा चेहरा पाहून त्यांना बायकोची किती आठवण येत आहे हे कळतंय. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. मात्र हे प्रेम जेव्हा अर्ध्यावर सोडून जातं तेव्हा दुख:चा डोंगर कोसळतो. असंच या आजोबांच्या बाबतीत घडलं आहे मात्र ते काहीच करु शकत नाहीयेत. त्यामुळे आपल्या माणसांची किंमत ते जवळ असताना केली पाहिजे कारण आठवण आभास देते स्पर्श नाही..

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vivekvyas127 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकानं म्हंटलंय, “वयाच्या शेवटच्या टप्प्यात जोडीदाराची खरी गरज असते” तर आणखी एकानं “आहे तोपर्यंत किंमत करा आठवण आभास देते स्पर्श नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader