Chaos At Jhansi Railway Platform: कुंभ मेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे या कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून, जगभरातील ४० कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील झाशीमधील वीरंगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री (१३ जानेवारी) महाकुंभ मेळ्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. या वेळी चेंगराचेंगरीचा धक्कादायक प्रकार घडला. शेकडो प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, तर काहीजण प्लॅटफॉर्म आणि रुळांवर पडल्याने गोंधळ उडाला आहे.याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
उत्तर प्रदेशातील झाशी येथील वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मोठा गोंधळ झाला. एका महिलेसह दोन प्रवासी रुळावर पडले आणि ट्रेनच्या अपघातातून थोडक्यात बचावले. अनेक प्रवासी फलाटावरही पडले.
नेमकं काय घडलं?
झाशी-प्रयागराज रिंग रेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक सहा ते आठवर साफसफाईसाठी पाठवली जात असताना संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास ही घटना घडली. १३ जानेवारी रोजी ट्रेन प्रयागराजहून झाशीला पोहोचली होती मात्र, प्रवाशांनी महाकुंभासाठी प्रयागराजला निघालेली गाडी समजून त्यात चढण्यासाठी धाव घेतली, त्यामुळे फलाटावर गोंधळ उडाला. त्यांच्यापैकी काहींनी रेल्वे रुळांवरून ट्रेनमध्ये चढण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती आणखी वाढली. पण काही प्रवाशांनी तत्परतेने संकटात सापडलेल्यांना मदत केली. रुळावर पडलेल्या दोन प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. गार्ड आणि ट्रेन डायव्हरच्या त्वरीत निर्णयाने ट्रेन योग्य वेळी थांबल्याने अनर्थ टळण्यास मदत झाली.
रेल्वे स्थानकावरील गर्दीचा व्हिडिओ आणि या घटनेचा व्हिडीओ प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी ही घटना गैरसमजातून घडल्याचे सांगत या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याची ग्वाही दिली आहे. तसेच परिस्थिती पूर्णपणे सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
quiziframe id=76 dheight=282px mheight=417px
पाहा व्हिडीओ
जादा गाड्या
भव्य महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाड्याही सोडण्यात येत आहेत. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी पूर्ण कुंभ आयोजित केला जातो, परंतु महाकुंभ १२ पूर्ण कुंभानंतर दर १४४ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो, असे महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर चेतनगिरी महाराज यांनी सांगितले.
महाकुंभ – मान्यतेनुसार प्रयागराजमध्ये १४४ वर्षांमध्ये एकदा महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. १४४ वर्षेच का? तर १२ गुणिले १२ केले की १४४ होतात. अशी मान्यता आहे की, कुंभ मेळेदेखील १२ असतात, त्यातील चार मेळ्यांचे आयोजन पृथ्वीवर, तर उर्वरित आठांचे आयोजन देवलोकांत केले जाते. या मान्यतेनुसार प्रत्येक १४४ वर्षांनंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन होते. २०१३ साली प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कारण- त्याच वर्षी १४४ वर्षे पूर्ण झाली होती. आता पुढील कुंभ मेळा १३८ वर्षांनी आयोजित होणार असल्याचे सांगितले जाते.