Funny video: भारतात अनेक वेगवगेळ्या धर्माची, जातीची आणि विचारसरणीची लोक राहतात. मात्र या फारकात एक गोष्ट सारखीच आणि ती म्हणजे लोकांची श्रद्धा. देशात धार्मिक पंथाची अनेक लोक पाहायला मिळतात. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक बारीकशी रेष असते. ही रेष कधी ओलांडली जाते ते अनेकदा लोकांना समजत नाही. मागेच सोशल मीडियावर लड्डू मुत्त्या नावाचा एक बाबा फार व्हायरल झाला आहे. यात तो पंख्याला हाथ लावून तो लोकांना आशीर्वाद देताना दिसून आला होता. लोकांनी या व्हिडिओची फार मजा घेतली. लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलाही फरक कळत नाही. याचंच एक उदाहरण दाखवणारा महाकुंभ येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात पुसटशी रेषा असते. श्रद्धा विश्वासाच्या आधारावर वाढत जाते, तर अंधश्रद्धेला ना डोकं असतं ना, पाय… हे सांगण्याचं कारण म्हणजे महाकुंभमध्ये चर्चेत आलेला फ्लायओव्हर बाबा..आतापर्यंत तुम्ही पिस्तुल्या बाबा, तवा बाबा, लड्डू मुत्त्या नावाचा बाबा असे अनेक बाबा पाहिले असतील मात्र सध्या फ्लायओव्हर बाबाची सोशल मीडियावर चर्चा आहे.

फ्लायओव्हरच्या खालून भाविक जात आहेत. त्याच दरम्यान काही भाविक उड्या मारून उड्डाण पूलाचे दर्शन घेत आहेत. फ्लायओव्हरच्या छताला हात लावून पाया पडत आहेत. तर काही महिला उड्डाणपूलाच्या बाजूच्या भिंतीला स्पर्श करून दर्शन घेत आहेत. त्याचं झालं असं की कुणी एकानं सहज फ्लायओव्हरच्या खालून जाताना वर हात लावला. हे पाहून सगळेच वर फ्लायओव्हरच्या छताला हात लावून पाया पडायला लागले. त्यामुळे आता फ्लायओव्हर बाबा म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

“म्हणूनच शिक्षण महत्त्वाचे आहे”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ rohitupadhyaay नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “म्हणूनच शिक्षण महत्त्वाचे आहे” दुसरा म्हणतो, “आपल्याकडे दगडातही देव शोधायची पंरपरा आहे त्यामुळे हे काही नवीन नाही” तर आणखी एकानं आपल्या देशातल्या लोकांचं अवघड आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.