Mahakumbh 2025 Fact Check Video : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा शुभारंभ झाला आहे. ४५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभ मेळ्याला ४० कोटींहून अधिक लोक भेट देणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यात देश-परदेशांतील साधू-संत, भक्तांचा समावेश आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही महाकुंभ मेळ्यासंदर्भातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातीलच एका व्हिडीओमध्ये महाकुंभ मेळ्याच्या परिसरातील एका रुग्णालयात भीषण आगीची घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात आठहून अधिक लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. पण, खरंच महाकुंभ मेळ्यात अशा प्रकारची कोणती घटना घडली का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं, तेच आपण जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

सायमा खान नावाच्या एका एक्स युजरने तिच्या प्रोफाइलवर महाकुंभ मेळ्यात आग लागल्याचा दावा करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
Video Viral poster
Video Viral : “बायकोला तिळगूळ देणे ही अंधश्रद्धा!”, हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरुण, नेटकरी, म्हणे, “भावा…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर

इतर युजरदेखील तोच दावा करीत हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओचे सत्य जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम इनव्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून, त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला हा व्हिडीओ @PrayagrajAmanVibes या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला आढळला. हा व्हिडीओ आठ दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे (भाषांतर) : कुंभमेळ्यातील रुग्णालयात आगीची घटना घडल्यास परिस्थिती कशी हाताळायची याविषयीचे मॉक ड्रिल #kumbh2025 #prehospitalcare

आम्हाला X वर UPPOLICE FACT CHECK ची एक पोस्टदेखील आढळली.

पोस्टमध्ये स्पष्ट केले गेले की, व्हिडीओ मॉक ड्रिलचा होता.

आम्हाला UP फायर इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरदेखील या मॉक ड्रिलबद्दलची एक पोस्ट आढळली.

तसेच, या मॉक ड्रिलचा व्हिडीओ फायर अॅण्ड इमर्जन्सी महाकुंभ २०२५ च्या X हॅण्डलवर शेअर करण्यात आला होता. व्हिडीओमधील दृश्ये व्हायरल व्हिडीओमधील दृश्यांसारखीच दिसत होती.

आम्हाला प्रयागराजमधील कुंभ मेळा येथील डीआयजी वैभव कृष्ण यांची एक पोस्टदेखील सापडली.

त्यांनीही पोस्टद्वारे स्पष्ट केले की, हा व्हिडीओ एका मॉक ड्रिलदरम्यानचा आहे. त्यामुळे व्हायरल झालेले दावे खोटे आणि केवळ अफवा आहेत.

निष्कर्ष :

प्रयागराजमधील महाकुंभ मेळा २०२५ च्या परिसरातील एका रुग्णालयात आग लागल्याचा दावा करीत मॉक ड्रिलचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल होणारे दावे खोटे आहेत.

Story img Loader