Mahakumbh Mela 2025 Viral Video : महाकुंभ मेळा हा प्रयागराज येथे दर बारा वर्षांनी भरतो. हिंदू धर्माचा प्रमुख उत्सव सध्या सुरू असून देशभरातली आणि देशाबाहेरील अनेक लोक या महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेले आहेत.
महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी दर दिवशी लाखो लोक प्रयागराजला जात आहे. यात विदेशातील लोक सुद्धा आवडीने सहभागी होत आहे. १३ जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू झाल असून २६ फेब्रुवारीला समाप्त होईल. सोशल मीडियावर महाकुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. व्हिडीओमध्ये काही विदेशी महिला अत्यंत श्रद्धेने भजन गीत गाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (MahaKumbh Mela 2025 Prayagraj A group of foreign devotees sing Om Jai Jagdish Hare bhajan)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विदेशी महिलांनी गायले ‘ओम जय जगदीश हरे’ भजन

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही विदेशी महिला ‘ओम जय जगदीश हरे’ हे लोकप्रिय भजन गीत गाताना दिसत आहे. महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या या विदेशी महिलांनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्या अत्यंत मनापासून भजन गीत गाताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एएनआयशी संवाद साधताना या विदेशी महिलांनी भजन गीत गायले आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

एएनआयने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाहा प्रयागराज येथे एका विदेशी भक्तांच्या चमूने महाकुंभ मेळ्यात सहभागी होताना ‘ओम जय जगदीश हरे’गीत गायले आहे”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारतीय भक्तांचे पण व्हिडीओ दाखवा” तर एका युजरने लिहिलेय, “जय महाकुंभ,जय प्रयागराज ,जय महाकाल जय गंगा माता”
काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्या साध्वीला युजर्सनी मेकअपवरून चांगलेच ट्रोल केले होते.