Prayagraj Mahakumbh Mela 2025: भारतीय संस्कृतीत महाकुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा हा सोहळा देशाचा सांस्कृतिक परिचय ठरला आहे. १९५४ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले होते. महाकुंभमेळ्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. प्रत्येक १२ वर्षांनी चार पवित्र ठिकाणी (प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक) हा मेळा भरतो. या मेळ्याला हिंदू धर्मात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. या मेळ्याचे खास आकर्षण म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले जाते. जगभरातील लाखो लोक या संधीचा लाभ घेतात.
२०२५ चा हा महाकुंभ मेळा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे. कारण दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा १४४ वर्षांनंतर खास संयोग निर्माण करत आहे. खरंतर आतापर्यंत १२ कुंभमेळे पूर्ण झाले आहेत. त्यामुळेच यंदाच्या या कुंभमेळ्याला महाकुंभ असे म्हटले जात आहे. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ जानेवारीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर यादरम्यानचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यात अनेक नागा साधू, विविध संत, ऋषी यांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये महाकुंभ सुरू असलेल्या परिसरात एका महिलेच्या अनाऊन्समेंटचा आवाज ऐकू येतो, ज्यात ती “मी सुशीला बोलतेय, गब्बर आणि महेंद्र कुठे आहात तुम्ही? मी टॉवरजवळ उभी आहे, मला घेऊन चला; महेंद्र आणि गब्बर यादव” असं म्हणत आहे. हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने शूट केला आहे तिनेदेखील या व्हिडीओमध्ये “गब्बर भैया हवे आहेत”, असे लिहिले आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ ट्विटरवरील @KreatelyMedia या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “गब्बर कहाँ हो तुम” आणि ‘जस्ट कुंभ मेला थिंग्स’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ८० हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “मजेशीर होतं हे”, दुसऱ्याने लिहिलंय की, “गब्बर हरवला आहे.”