Mahakumbh Mela Beautiful Girl Viral Video: प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून, यासाठी देशातील अनेक साधूसंत आणि भाविक दाखल होतायत. एकीकडे महाकुंभमेळा सुरू असताना दुसरीकडे त्यातील साधू, साध्वी तसेच आयआयटीयन्स बाबांची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर यासंबंधित रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना आता एक सुंदरी चर्चेत आली आहे.
माळा विकणारी ही मुलगी खूप सुंदर दिसत असून अनेकांनी तिच्यामागे सेल्फी घेण्यासाठी गर्दी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेमकं या व्हिडीओत आहे तरी काय, जाणून घेऊ या…
महाकुंभ मेळ्यात ‘त्या’ मुलीच्या मागे जमली गर्दी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कुंभमेळ्यातील या सुंदर मुलीच्या आजूबाजूला गर्दी जमलेली दिसतेय. अशातच एक माणूस “तुम्ही कुठल्या आहात” असा प्रश्न तिला विचारतो, यावर ती “इंदौर” असं उत्तर देते. यावर तो माणूस तिला म्हणतो “तुमचं इन्स्टाग्राम, फेसबुक आहे का?” या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर येताच तो माणूस तिला म्हणतो, “तुम्ही तर प्रसिद्ध झालात मग, तुमचे फॉलोवर्स वाढतील तर तुम्हाला त्याचा फायदाच आहे ना, आज तुम्ही माळा विकताय, उद्या तुम्ही कोटी रुपये कमवाल, मग ही चांगली गोष्ट आहे ना?”
यावर मुलगी फक्त स्मितहास्य करते आणि तिथून निघून जाते. तरीही तो माणूस तिचा पिछा सोडत नाही आणि व्हिडीओमध्ये म्हणतो की, “तुम्ही बघू शकता की, वृद्धांपासून तरुणांपर्यंत ही एवढी गर्दी फक्त या मुलीच्या मागे फोटो काढण्यासाठी झाली आहे. ही मुलगी खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता” असंही तो म्हणाला.
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिला त्रास देणं थांबवा”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “यासाठी ठेवलाय का कुंभमेळा?” तर एकाने “भावा, तू कुंभ बघायला गेलायस मुलगी नाही”, अशी कमेंट केली. “ती सुंदर आहेच, पण तुम्ही किती निर्लज्ज आहात” अशी संतप्त प्रतिक्रियादेखील एकाने दिली.