Mahakumbh Mela Viral Video: कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ असणार आहे. यामुळेच लोक मोठ्याप्रमाणात कुंभमेळ्याला येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये देशातील अनेक साधू-संत आणि भाविक दाखल होतायत. एकीकडे महाकुंभ मेळा सुरू असताना दुसरीकडे त्यातील साधू, साध्वी तसेच आयआयटीयन्स बाबांची चर्चा रंगली आहे. तसेच या कुंभमेळ्यातील अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या महाकुंभमेळ्यातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका माणसाने गर्दीतून पुढे जाण्यासाठी आपल्या जीवाशीच खेळ केला.

महाकुंभमेळ्यातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महाकुंभमेळ्यात एका ब्रीजवर खूप गर्दी जमलेली दिसतेय. मुंगी शिरायलाही जागा नाही असं दिसंतय. पण गर्दीपासून वाचण्यासाठी आणि लवकर पुढे जाण्यासाठी एक माणूस आपल्या जीवाशी खेळताना दिसतोय. ब्रीजवरील सुरक्षाभींतीच्या पलीकडून तो चालताना दिसतोय. अगदी लहानशा भागातून तो आपला जीव धोक्यात घालत चालत आहे. इतक्या उंचावरून तो हा स्टंट करताना दिसतोय. बाहरून पकडून पकडून चालत असताना त्याला आपण खूप मोठी चूक केलीय, याची जाणीव होते आणि तो पुन्हा सुरक्षाभींत ओलांडून ब्रीजवर जातो.

महाकुंभमेळ्यातील हा व्हायरल व्हि़डीओ @iam_star_amit_kumar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “महाकुंभ में इतना बड़ा रिस्क” (महाकुंभमध्ये एवढा मोठा धोका) अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ६ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा लोकांमुळे चेंगराचेंगरी झाली असावी” तर दुसऱ्याने “अरे, स्वत:च्या जीवाची तरी पर्वा करा” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “असा वेडेपणा हे करणार आणि नंतर सरकारला दोषी ठरवणार”