Mahakumbha mela 2025 Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी प्रचंड गर्दीत लोकांवर लाठीचार्च करत असल्याचे दिसतेय. दरम्यान हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये नुकत्यात संपन्न झालेल्या महाकुंभमेळ्यातील असल्याचा दावा केला जात आहे. महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या दिवशी लोकांची झालेली प्रचंड गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हा लाठीचार्ज केल्याचा दावाही या व्हिडीओसह केला जात आहे. त्यामुळे आम्ही हा व्हिडीओ खरंच महाकुंभमेळ्यातील आहे का याचा तपास घेण्यास सुरुवात केली तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं ते नेमकं काय होत जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर हर्ष प्रयागी याने त्याच्या हँडलवर एक रील शेअर केली आहे.

इतर युजर्स देखील त्याच दाव्यासह रील शेअर करत आहेत.

तपास:
व्हिडिओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला. यावेळी आम्हाला २६ डिसेंबर २०२४ रोजी पोस्ट केलेला एक व्हिडिओ मिळाला.
आणि दुसरा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्ट केला होता.
यावरून असे दिसून येते की, व्हिडिओ अलीकडील नाही. महाकुंभ मेळा १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला, तर व्हायरल व्हिडिओ त्या तारखेपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
हा व्हिडिओ राहुल साहा यांनी १५ नोव्हेंबर रोजी पोस्ट केला होता आणि त्यावर अनेक कमेंट्स या बंगाली भाषेत होत्या.
त्यानंतर आम्ही या व्हिडिओंमधून कीफ्रेम काढले पण ज्यावर कोणताही मजकूर नव्हता, त्यामुळे आम्ही काही दृश्य संकेतांसाठी व्हिडिओ नीट तपासला. फोटोंमध्ये झूम करुन पाहिले तेव्हा आम्हाला लक्षात आले की, होर्डिंग्ज बंगाली भाषेत आहेत. तसेच, आम्हाला बाजारात एक टॉवर घड्याळ दिसला. त्यानंतर आम्ही “बंगालमधील टॉवर घड्याळ” हा कीवर्ड शोध घेतला आणि सर्व घड्याळ टॉवरची फोटोत दिसणाऱ्या टॉवरशी तुलना केली. आम्ही असा निष्कर्ष काढला की, हा टॉवर घड्याळ पश्चिम बंगालमधील कृष्णनगरचा आहे.
त्यानंतर आम्ही YouTube वर “कृष्णनगर, बंगाल पोलिसांचा लाठीचार्ज” हा कीवर्ड शोध घेतला. यावेळी आम्हाला News18 Bangla वरील व्हिडिओ मिळाला.
मथळा नमूद केला: कृष्णनगर बातम्या : जगद्धात्री पुजा বিসর্জন মিলন উত্তেজনা ! বিশৃঙ্খলা
भाषांतर:
कृष्णनगर न्यूज : जगद्धात्री पूजेच्या विसर्जन मिरवणुकीत गोंधळ! परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
या व्हिडिओतील दृश्य व्हायरल व्हिडिओतील दृश्यांसारखेच होते.

आम्हाला या घटनेबाबत काही बातम्याही मिळाल्या.
या बातमीत नमूद केले होते की, रविवारी संध्याकाळी जगद्धात्री दूर्गा मूर्तींच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान कृष्णनगरमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मिरवणुकीच्या प्रमुख ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिस चौकात हा गोंधळ झाला. विसर्जन पाहण्यासाठी हजारो भाविक जमले होते, ज्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली, या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
इतर माध्यम संस्थांनीही हा अहवाल प्रसिद्ध केला.

आम्ही गुगल मॅप्स वापरून दृश्य घटकांची देखील तपासणी केली. आम्हाला व्हिडिओचे स्थान देखील सापडले.

महाकुंभ मेळाच्या शेवटच्या दिवसांमध्ये अशी कुठली घटना घडली का? याचा आम्ही तपास केला तेव्हा आम्हाला कुठलेही वृत्त आढळले नाही.
निष्कर्ष:
प्रयागराजमध्ये महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याचा दावा करत शेअर केला जात असलेला व्हिडिओ खोटा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ जुना आहे आणि तो पश्चिम बंगालमधील कृष्णनगरचा आहे. जगद्धात्री दूर्गा मूर्तीच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान झालेल्या गोंधळात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा हा व्हिडीओ आहे.