Mahakumbh 2025 Girl Viral Video : उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात देश-परदेशातून लाखो भाविक दाखल होत आहेत. या ठिकाणी संगम नदीच्या काठावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पण, श्रद्धेचे केंद्र बनलेल्या महाकुंभमेळ्यात काही लोक अश्लीलता पसरवण्याचे काम करत आहेत, सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय, जो पाहून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक तरुणी शरीराभोवती अगदी तोकडा टॉवेल गुंडाळून स्नान करण्यासाठी संगम काठावर जात आहे. व्हिडीओ पाहून हे स्पष्ट होते की तिने हे फक्त रील बनवण्यासाठी केले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी पांढऱ्या रंगाचा तोकडा टॉवेल गुंडाळून अंघोळीसाठी संगमाकडे जाताना दिसत आहे. इतक्या गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारचं तिचं असं अश्लील वागणं पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
‘अशा रील नको बनवूस, देवा…”
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या तरुणीवर टीका करायला सुरुवात केली आहे. @meevkt नावाच्या एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, महाकुंभाच्या पवित्र भूमीवरही हे नाटक सुरू आहे, ए बाई थोडीतरी लाज बाळग, तुम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी आला आहात, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा-मस्ती करण्यासाठी नाही. गंगेत जनस्नान कर, डुबकी मार- पूजा अर्चा कर आणि आयुष्य सुधार, पण अशा रील नको बनवूस, देवा…
या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, अर्धनग्न रील्सचा हा आजार महाकुंभापर्यंत पोहोचला आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, भारतातील तरुण पिढीला असे पाहणे दुर्दैवी आहे. या समाजविघातक घटकांनी श्रद्धेच्या महाकुंभमेळ्यात एक दुर्गंधी निर्माण केली आहे.
टॉवेल गुंडाळून रील बनवण्याची ही कल्पना सर्वप्रथम इंडिया गेट येथे कलकत्त्याच्या मॉडेल सन्नाती मित्रा हिने सुरू केल्याचे दिसले. या मॉडेलने इंडिया गेटवर लोकांसमोर फक्त टॉवेलमध्ये ‘मेरे ख्वाबों में जो आये…’ या गाण्यावर एक रीलदेखील बनवली. या रीलवरही लोकांनी तीव्र संताप व्यक्त करत तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.