Mahakumbha Sadhu Wedding Video Fact Check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एका अघोरी साधूने लग्नगाठ बांधल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यावरून आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण खरंच अशा प्रकारे महाकुंभ मेळ्यात अघोरी साधूने विवाह केला का? याविषयीचे सत्य आपण जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @divyakumaari ने त्याच्या प्रोफाइलवर खोट्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही InVid टूलवर रील अपलोड करून तपास सुरू केला आणि रिव्हर्स इमेज सर्चसाठी अनेक कीफ्रेम्स मिळवल्या.
आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ २४ आठवड्यांपूर्वी ५ ऑगस्ट २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता.
कॅप्शनवरून असे दिसून आले की, हा व्हिडीओ उज्जैनचा आहे.
हा व्हिडीओ प्रयागराजच्या महाकुंभाच्या कालावधीपेक्षा फार जुना होता.
कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ २१ मार्च २०२४ रोजी YouTube वर अपलोड करण्यात आला होता आणि त्याला १.४ कोटी व्ह्युज मिळाले होते.
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दरवर्षी होणाऱ्या पारंपरिक शिव-पार्वती लग्नसोहळ्याबद्दलच्या काही बातम्या आम्हाला सापडल्या.
आम्हाला यासंबंधीचे व्हिडीओ रिपोर्ट्सदेखील सापडले.
निष्कर्ष :
उज्जैनच्या शिव-पार्वती विवाह सोहळ्याचा एक जुना, असंबंधित व्हिडीओ अलीकडचा सांगून व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रयागराजच्या महाकुंभात एका साधूचे लग्न झाल्याचे खोटे दावे केले गेले आहेत. त्यामुळे व्हायरल व्हिडीओ प्रयागराजमधील महाकुंभातील नसून उज्जैनमधील आहे.