Mahakumbha Mela Sadhu Video Fact Check विश्वास न्यूज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात देशासह जगभरातून कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. दरम्यान, महाकुंभ मेळ्यासंबंधित अनेक बनावट फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा रीतीने सोशल मीडियावर भीती, अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच कुंभ मेळ्यासंबंधित दावा करणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात भगवा कुर्ता, धोतर घातलेल्या एका व्यक्तीशी काही लोक कुस्तीच्या आखाड्यात भांडताना, त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसतायत. हा व्हिडीओ प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यातील असल्याचे सांगून, येथे साधूचा अपमान करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, ‘विश्वास न्यूज’ने याबाबत जेव्हा तपास केला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं. एका बॅनरवरून हा व्हि़डीओ नेमका कुठला आहे ते समोर आलं आहे.

काय होत आहे व्हायरल?

‘रजित राम रजित राम’ या इन्स्टाग्राम हॅण्डलने ११ जानेवारी रोजी एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओद्वारे त्यांनी दावा केला, “प्रयागराजच्या महाकुंभ नगरीत संत आणि ऋषींचा अपमान करणे सर्वांनाच महागात पडले.”

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

व्हायरल पोस्टमधील मजकूर येथे जसाच्या तसा लिहिला आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्स हा व्हिडीओ समान दाव्यांसह शेअर करीत आहेत.

तपास :

महाकुंभ मेळ्यात कोणत्याही साधू-संत वा ऋषीबरोबर खरोखरच अशी कोणतीही घटना घडली असती, तर ती नक्कीच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली असती. आम्ही गूगल ओपन सर्च टूल वापरून कीवर्डद्वारे सर्च केले. परंतु, आम्हाला कोणत्याही बातमीतून अशी कोणतीही घटना घडली असल्याचे आढळले नाही.

तपास पुढे नेत आम्ही व्हायरल व्हिडीओच्या अनेक क्री फ्रेम्स काढल्या. त्यानंतर गूगल लेन्स टूलद्वारे सर्च केले. यावेळी आम्हाला RDX Chitrakoot Tv नावाच्या एका YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ सापडला, जो २१ डिसेंबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हायरल पोस्टमधील व्हिडीओ क्लिप आम्हाला या क्लिप व्हिडीओच्या सुरुवातीला दिसली.

‘विश्वास न्यूज’ने संपूर्ण ८:३१ मिनिटांचा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. व्हिडीओच्या सहा मिनिटांवर आम्हाला एक बॅनर दिसला. त्यावर मोठ्या बक्षिसाची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, असे लिहिले होते.

त्याशिवाय व्हिडीओमध्ये केल्या जाणाऱ्या समालोचनातून अशीही माहिती मिळाली की, हा व्हिडीओ एखाद्या कुस्ती स्पर्धेचा आहे.

व्हायरल व्हिडीओबाबत आम्ही या यूट्यूब चॅनेलचे ऑपरेटर रवी द्विवेदी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी सांगितले की, व्हायरल पोस्टमध्ये वापरलेला व्हिडीओ त्यांचाच आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कौशांबीच्या कनेली येथे ही कुस्ती स्पर्धा झाली होती. अजय सिंग पटेल यांनी त्याचे आयोजन केले होते.

‘विश्वास न्यूज’ने पुन्हा एकदा गूगल ओपन सर्च टूलचा वापर केला. कीवर्ड वापरून शोधल्यावर आम्हाला अजय सिंग पटेल यांचे फेसबुक अकाउंट सापडले. त्यावर शोध घेतल्यावर आम्हाला एक पोस्ट सापडली. १८ व १९ नोव्हेंबर २०२४ रोजी कनेलीच्या ऐतिहासिक जत्रेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या बक्षिसाची कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाईल, असे सांगितले होते.

‘विश्वास न्यूज’ने तपास पुढे नेला आणि प्रयागराज येथील दैनिक ‘जागरण’चे संपादकीय प्रभारी राकेश पांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडीओचा प्रयागराजच्या महाकुंभाशी काहीही संबंध नाही.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, महाकुंभ १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला होता आणि व्हायरल व्हिडीतील मूळ व्हिडीओ २१ डिसेंबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. अशा परिस्थितीत कुस्ती सामन्याचा व्हिडीओ महाकुंभ मेळ्याशी जोडून बनावट दाव्यासह व्हायरल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट होते.

चौकशीच्या शेवटी, बनावट पोस्ट करणाऱ्या युजरची चौकशी करण्यात आली. हे अकाउंट ऑगस्ट २०२४ मध्ये तयार करण्यात आल्याचे उघड झाले. त्याचे २,५०० फॉलोअर्स आहेत.

निष्कर्ष :

महाकुंभ मेळ्यात एका साधूचा अपमान झाल्याचे दर्शवून, व्हायरल केला जाणारा व्हिडीओ कौशांबीचा असल्याचे सिद्ध झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कौशांबीतील कनेली येथे कुस्ती स्पर्धा झाली होती. त्याच स्पर्धेचा व्हिडीओ आता महाकुंभ मेळ्यात साधूचा अपमान केला गेल्याचा खोटा दावा करीत व्हायरल केला जात आहे.

(ही घटना मूलतः ‘विश्वास न्यूज’ने प्रकाशित केली आहे आणि ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ त्याचे भाषांतर करून, पुनर्प्रकाशित करीत आहे.)

https://www.vishvasnews.com/society/old-dangal-video-shared-as-insult-of-sadhu-at-mahakumbh-2025

Story img Loader