भारतातील बहुतांश नागरिक ट्रेनच्या सामान्य डब्यातून प्रवास करत असतात. रेल्वे स्थानकावर कुटुंबीयांसोबत असल्यावर प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या कॅन्टिनमधून स्नॅक्स आणि वडापाव खायला अनेकांना आवडतं. भारतात मुंबईत असणाऱ्या ट्रेनला तर जीवनवाहिनीच म्हणतात. कारण सामान्य नागरिकांना आधार देणारी ट्रेन रोजच्या प्रवासात एकप्रकारे सादच घालत असते. पण भारतातील महाराजा ट्रेन राजा माणसांसाठी बनवली असावी, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या महाराजा ट्रेनचं तिकिट ५० किंवा १०० रुपये नाही, तर चक्क १९ लाख रुपये आहे. लाखाच्या घरात ट्रेनच्या तिकिटची किंमत सामान्यांना परवडणारी नाही. कारण या ट्रेनचा प्रवास जगातील सर्वात लक्झरी प्रवास मानला जातो. या महाराजा ट्रेनमध्ये प्रवाशांना सर्व सोयी सुविधा शाही थाटात दिल्या जातात. भन्नाट वैशिष्ट्य असलेल्या ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा