Ladki Bahin Yojana Memes and Viral Video : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यात भाजपा समर्थित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून तब्बल २३५ जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यात एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आणि त्यामुळे तो सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेची कमालीची जादू पाहायला मिळाली. या योजनेमुळेच पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स, व्हिडीओंचा महापूर आला आहे. काहींनी या योजनेवरून मीम्सच्या माध्यमातून महायुती सरकारवर ‘निशाना’ साधला आहे; तर काहींनी कौतुक केले आहे. चला तर मग पाहू लाडकी बहीण योजनेवर व्हायरल होणाऱ्या मजेशीर मीम्स
Ladki Bahin Yojana Memes : महायुतीची सत्ता येताच सोशल मीडियावर ‘लाडकी बहीण’ योजनेवरून मीम्स, व्हिडीओंचा महापूर
Memes on Mahayuti Ladki Bahin Yojana : महायुतीची सत्ता येताच सोशल मीडियावर लाडकी बहिणी योजनेवरुन मीन्स व्हायरल
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 24-11-2024 at 13:34 IST | © IE Online Media Services (P) Ltd
TOPICSउद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoनिवडणूक २०२४Electionमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमाझी लाडकी बहीण योजनाLadki Bahin Yojanaव्हायरल व्हिडीओViral VideoशिवसेनाShiv Sena
+ 5 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election results 2024 as mahayuti come in power memes and videos of ladki bahin yojana viral on social media sjr