Maharashtra Bendur Festival 2023: कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. बैलांप्रती आदर व्यक्त करणारा दिवस आणि सण म्हणून बेंदूर सणाची ओळख आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाच्या कष्टाचे कौतुक आजच्या दिवशी केले जाते. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जाते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घातली जाते. आणि गावातून बैलांची मिरवणूक काढली जाते. अशाच एका बैलाच्या मिरवणूकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बैलाच्या मालकांनी बैलाला अतिशय सुंदर असं सजवल्याचं दिसत आहे. बैलाच्या शिंगानाही गोंड्यांनी सजवलं आहे. या बैलाच्या मालकांना अतिशय दिमाखात या बैलाची मिरवणूक गावातून काढली आहे. बैलसुद्धा अगदी रुबाबदार दिसत आहे. शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Guru Purnima 2023: गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी मेसेज, स्टेटस!
एकादशीनंतर दरवर्षीप्रमाणे बारशीला बेंदुर साजरा करत असताना गावातील प्रत्येक घरातील बैलजोड्या यावेळी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.