Holi 2024: आजोबा हे नातवाचा पहिला मित्र असतो, आणि नातु हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. नातवंडं म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय. अगदी जीव की प्राण. ते वागतातच इतकं प्रेमाने तर कशाला नातवंडं घाबरतील त्यांना.असाच आजोबा आणि नातवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे आजोबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या ठाणे येथील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. नातू रुद्राश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी त्यांची पत्नी सौ.लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी आपला नातू रुद्रांश मुलगा खासदार श्रीकांत शिंदे तसेच आपल्या पत्नी आणि अन्य कुटुंबीयांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणे तसेच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला घालून मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंद अधिक द्विगुणीत केला. होळी, धूलिवंदनानिमित्त मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या. या सणांच्या उत्सव-उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचे, नैसर्गिंक रंगाच्या वापराचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे.
पाहा फोटो
हेही वाचा >> VIDEO: काशिनाथाचं चांगभलं…बावधनचा “बगाड्या” ठरला; बगाड ओढण्यासाठी बारा बैलांची जोडी सज्ज, यात्रेची लगबग सुरु
मुख्यमंत्र्यांची दुसरी बाजू या फोटोमधून पाहायला मिळाली. या फोटोंवर नेटकरी कमेंट करुन मुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहेत.