Viral Video : पुणे हे देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील संस्कृती असो की येथील भाषा, शिक्षण असो की येथील ऐतिहासिक वास्तू , सर्व काही लोकप्रिय आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. गाव खेड्यातील येणारी मुलं येथे शिक्षण घेऊन स्वत:चे उज्वल भविष्य घडवतात. सोशल मीडियावर पुण्यातील विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन कॉलेजची मुलं पाठीवर बॅग घेऊन वारकरी पोशाखात दिसत आहे. त्यांचा हा वारकरी पोशाख पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुण वारकरी पोशाखात दिसत आहे. धोतर, पांढरी बंगाली अन् डोक्यावर टोपी, तरुणांचा हा पारंपारिक लूक पाहून रस्त्यावरील अनेक जण त्यांच्याकडे पाहताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की काही तरुणी या दोन तरुणांना पाहून हसताना दिसत आहे.तरुणांचा हा वारकरी पोशाख पाहून काही लोकं थक्क झाले. काही लोकांची त्यांच्यावरुन नजर सुद्धा हटत नाही.तरुणांनी चष्मा सुद्धा घातला आहे. त्यांचा हा वारकरी स्वॅग पाहून कोणीही भारावून जाईल.
वारकरी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी संप्रदायाचे लोक राहतात. दरवर्षी वारकरी मोठ्या संख्येने पायी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जातात.हीच महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या या तरुणांना पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे खूप कौतुक केले आहेत.
हेही वाचा : VIDEO : काय सांगू राणी मला गाव सुटना! हातावरची गावाकडली इडली खाल्ली का? पाहा हा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राची संस्कृती आहे ती” तर एका युजरने लिहिलेय, “कडक, आपली संस्कृती” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही खरी आपली परंपरा”
काही युजर्सनी हसणाऱ्या मुलींवर रोष व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “अरे हसणाऱ्यांनो हीच आपली संस्कृती आहे. त्यावर तरी हसून का.. तुमच्या आई बापाने आज्यांनी पण हेच कपडे घालून दिवस काढलेत. त्याची तरी जाणीव असू द्या” तर एका युजरने लिहिलेय, “या मुली बाहेरच्या राज्यातून आल्या असतील. त्यांना काय माहिती, महाराष्ट्राची संस्कृती किती महान आहे”. mad_prank_’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.