राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अनेक दिग्गज नेत्यांनी ट्विटवरुन महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. अनेकांनी ट्विटरवर महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विट केले आहे. त्यामुळेच ट्विटवरही महाराष्ट्र दिनाचीच चर्चा दिसत असून देशातील टॉप ट्रेण्डींग टॉपिक पैकी पहिले दोन टॉपिक हे महाराष्ट्र दिनाचेच आहेत. #महाराष्ट्रदिन आणि #MaharashtraDay हे दोन्ही हॅशटॅग देशात टॉप ट्रेण्ड होताना दिसत आहेत.

#महाराष्ट्रदिन हा हॅशटॅग वापरून अनेकांनी महाराष्ट्राबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गोष्टींच्या माहितीपासून ते अनेक फोटोही ट्विपल्सने ट्विट केले आहेत. विशेष म्हणजे आज गुजरातचा स्थापना दिवस आणि जागतिक कामगार दिनही आहे. #LabourDay हा हॅशटॅग तिसऱ्या क्रमांकावर असून #GujaratDay पाचव्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे. कामगार दिनानिमित्त #MayDay सहाव्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

शरद पवार

देवेंद्र फडणवीस

नितीन गडकरी

सुरेश प्रभू

राज ठाकरे

अनेक मराठी कलाकारांनाही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख

केदार शिंदे

जेतेंद्र जोशी

सुबोध भावे

ऑफलाइन जगाबरोबरच ऑनलाइनवरही महाराष्ट्र दिनाचा उत्साह दिसून येत आहे असचं या ट्रेण्डवरुन म्हणता येईल.

Story img Loader