राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६ लाख ७६ हजार ८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडयात केवळ ३ लाख ८० हजार १७७ इतके मतमूल्य जमा झाले. या विजयानंतर सर्वच स्तरामधून मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.
नक्की पाहा >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार CM शिंदेंचा सल्लागार? सेवानिवृत्तीनंतर ७ वेळा मिळाली मुदतवाढ
महाराष्ट्र सरकारअंतर्गत येणाऱ्या सरकारी कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आलेल्या या अभिनंदनाच्या पोस्टमध्ये मुर्मू यांचा फोटोच नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या पोस्टमध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो दिसत असून यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. किमान ज्या राष्ट्रपती झाल्या आहेत त्यांचा तरी फोटो लावायला हवा होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी ही अभिनंदनाची पोस्ट पाहून राष्ट्रपती कोण झालंय हेच कळत नसल्याचा उपाहासात्मक टोला लगावला आहे.
नक्की वाचा >> …अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला
महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत पेजवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुर्मू यांच्या विजयानंतर त्यांचं अभिनंदन करताना काय म्हटलंय यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीय. “भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे- मुख्यमंत्री”, अशा कॅप्शनसहीत मुर्मू यांच्या विजयानंतर या या पेजवरुन एक फोटो शेअर करण्यात आलाय. मात्र या फोटोमध्ये केवळ एकनाथ शिंदेंच दिसत अशून बाजूला महाराष्ट्र शासन असं लिहिण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> Devendra Fadnavis Birthday: भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…”

मात्र हा फोटो अनेकांना खटकला असून कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यापैकी काही मोजक्या प्रतिक्रिया आपण पाहूयात…
नक्की वाचा >> ‘हे सरकार बेकायदेशीर असून लवकरच कोसळणार’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “ज्यांना स्वत:चं…”
१) मुर्मू यांचा फोटो नाही सापडला का?

२) यात राष्ट्रपती कुठं आहेत?

३) राष्ट्रपतींचा फोटो दाखवा गुवाहाटीची दोन तिकीटं जिंका

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंच्या ‘बंडखोर गद्दार’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांना काय…”
४) शेठ कोपऱ्यात तरी जागा देतात…

५) नक्की राष्ट्रपती झालंय कोण?

६) राष्ट्रपतींचा फोटो गुवाहाटीतच राहिला

नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे यांनी केलेला एक दावा फोल ठरलाय. राष्ट्रपती निवडणुकीत राज्यात भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना २०० आमदारांची मते मिळतील, हा शिंदे यांचा दावा फोल ठरला. राज्यातून मुर्मू यांना १८१ तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना ९८ मते मिळाली.