Maharashtra Day 2023 Wishes : महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे (1 May) रोजी साजरा केला जातो. १९६० मध्ये या दिवशी महाराष्ट्राच्या रूपाने भारताला नवे राज्य मिळाले. राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात सरकारी सुट्टी असते. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत ते आताच्या पिढीतील सचिन तेंडुलकर ते लाटा मंगेशकर असे अनेक हिरे महाराष्ट्राने जगाला दिले आहेत. याशिवाय जन्माने नव्हे तर कर्माने ज्यांनी स्वतःची ओळख घडवली अशाही अनेकांच्या आयुष्यात महाराष्ट्राचे काही ना काही योगदान आहेच. म्हणूनच मराठी माणसासाठी हा दिवस म्हणजे मोठा उत्सवच असतो.या खास दिनी तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी काही खास मेसेज घेऊन आलो आहोत.
तुम्ही खाली देण्यात आलेले ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, डाउनलोड करून ठेवू शकता, तसेच तुमच्या इतरही मित्र मैत्रिणींसह शेअर करून त्यांचाही वेळ वाचवू शकता. दिवाळीच्या दिवशी व्हाट्सऍप स्टेटस, इंस्टग्राम, फेसबुकसह तुम्ही वापरत असणाऱ्या सोशल मीडियावरून ही ग्रीटिंग्स शेअर करायला विसरु नका.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचे छत्रपती आमचे शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्र दिनाचे तुमचे फोटो व खास क्षण आमच्यासह शेअर करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा एकदा आमचा साभिमान जय महाराष्ट्र!