Maharashtra Day 2024 Wishes : सह्याद्रीचा सिंह गर्जतो.. शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! १ मे हा दिवस समस्त महाराष्ट्रासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या मराठी मनासाठी अभिमानाचा, गौरवाचा मानला जातो. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत ते आताच्या पिढीतील सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर असे अनेक हिरे महाराष्ट्राने जगाला दिले आहेत. याशिवाय जन्माने नव्हे तर कर्माने ज्यांनी महाराष्ट्राला आपलंसं केलं अशाही अनेकांच्या आयुष्यात महाराष्ट्राचे योगदान आहेच. हुतात्म्यांच्या बलिदानाने आजच्या दिवशी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली होती. ६४ वर्षांनी आज पुन्हा त्याच आठवणींना उजाळा देण्याचा आजचा दिवस. आणि याच दिवसाचे औचित्य साधून आज आपण महाराष्ट्र दिनाचा गौरव साजरा करणार आहोत. विशेष म्हणजे आजच्या दिवशी मराठी राजभाषा दिन सुद्धा साजरा केला जातो. हे दोन्ही शुभ मुहूर्त साधून आजच्या महाराष्ट्र दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
महाराष्ट्र दिन विशेष मराठी शुभेच्छापत्र आपण मोफत डाऊनलोड करून शेअर करू शकता. तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबाला, सहकाऱ्यांना सोशल मीडियावर पाठवण्यासाठी ही मराठी शुभेच्छापत्रे पाहा


धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचे छत्रपती आमचे शिवराय…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!


हे ही वाचा<< “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे रोजी का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? जाणून घ्या इतिहास अन् महत्त्व
तुम्हाला पुन्हा एकदा आमचा साभिमान जय महाराष्ट्र!