Maharashtra Election 2024 BJP Banner Fact Check : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे, यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडका लावला आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्यांमध्ये सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे मनसे, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षही जोर लावताना दिसतायत. महाराष्ट्रातील निवडणुकांदरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमला एक्सवर महायुतीच्या आघाडीचे एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसहित मराठीत एक संदेश लिहिला आहे की, ‘गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा महायुतीला मतदान करा…’, पण खरंच अशाप्रकारचे पोस्टर तयार करण्यात आले होते का? याबाबतचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं, ते नेमकं काय आहे जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @girija333 ने सोशल मीडिया प्रोफाइलवर इमेज शेअर केली आहे.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह पोस्टर फोटो शेअर करत आहेत.

हेही वाचा – “मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा

तपास:

आम्ही पोस्टरवरील मजकूर कॉपी केला आणि नंतर Google कीवर्ड सर्चने तपास सुरू केला. यावेळी पोस्टरवर मराठी मजकूर लिहिला होता: भाजपा-महायुती आहे तर गती आहे, गुजरातची प्रगती आहे.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी शेअर केलेल्या मूळ पोस्टरवर आढळलेला मजकूर असा होता की: भाजपा – महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.

आम्ही InVid टूलचे इमेज फॉरेन्सिक वापरून इमेजचे विश्लेषणदेखील केले.

‘ट्रेसस’ फिल्टरद्वारे आम्ही पोस्टरमध्ये लिहिलेल्या मजकुराचे विश्लेषण केले. यावेळी आढळून आले की, व्हायरल होणारे पोस्टर विशेष प्रकारे एडिट केले होते.

निष्कर्ष :

सोशल मीडियावर शेअर केलेले गुजरातच्या प्रगतीसाठी मत मागणारे महायुती आघाडीचे पोस्टर हे एडिट करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे पोस्टरही बनावट आहे आणि त्यावर लिहिलेला दावाही खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election 2024 bjp banner fact check edited poster of mahayuti alliance asks to vote for progress of gujarat viral sjr