Maharashtra Election 2024 Rally Fact Check : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरही प्रचाराचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाच एक व्हिडीओ शेअर होत असल्याचे आढळून आले आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे. २ मिनिट २० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये लोक हातात भगवे झेंडे घेऊन एका इमारतीखाली जोरजोरात ‘जय श्रीराम’चा नारा देताना दिसत आहेत. तसेच इमारतींच्या बाल्कनीत उभे राहून काही लोक टाळ्या वाजवताना आणि नारेबाजी करताना दिसत आहेत. पण, खरंच हा व्हिडीओ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यानचा आहे का याचा आम्ही शोध घेतला? त्यावेळी व्हिडीओमागची एक सत्य बाजू समोर आली. ती नेमकी काय पाहूया…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर अनिरुद्ध जोशीने त्याच्या प्रोफाईलवर व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
Maharashtra News Updates
Maharashtra Assembly Special Session : पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू
Devendra Fadnavis sworn in as twenty first Chief Minister of Maharashtra on 5 December 2024
विधानसभेची नवी दिशा

इतर युजरदेखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यातून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

आम्हाला तोच व्हिडीओ १५ फेब्रुवारी २०२२ रोजी Indra veer singh “santosh” या फेसबुक पेजवरून अपलोड करण्यात आला आहे असे आढळले, यावरून हा व्हिडीओ जुना आणि अलीकडील नसल्याचे सुचित होते.

आम्हाला १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सनातनी अभिषेक सिंह चौहान यांची फेसबुक पोस्टदेखील आढळली.

कल्याणपूरच्या गौतम नगर, कान्हा श्याम अपार्टमेंट, डिव्हिनिटी होम अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट्स, इम्पीरियल हाइट्स आणि इंदिरा नगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रभातफेरीचा (सकाळ रॅली) भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. कल्याणपूर स्थानकासमोरील जीटी रोडवर रॅलीचा समारोप झाला.

Google कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला आढळले की, पोस्टमध्ये नमूद केलेले ठिकाण कानपूरमधील आहे.

आम्हाला १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने पोस्ट केलेला एक फेसबुक व्हिडीओदेखील सापडला, ज्यात व्हिडीओ कानपूर पश्चिमेचा असल्याचे नमूद केले आहे.

व्हिडीओच्या शेवटी लोक ‘व्होटिंग मस्ट, नेशन फर्स्ट’ अशी घोषणा देत २० तारखेला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

गूगल कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला आढळले की, कानपूरमधील विधानसभेच्या १० जागांसाठी २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान झाले.

निष्कर्ष :

कानपूरमधील प्रभात फेरीचा २०२२ चा व्हिडीओ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा असल्याचा दावा करून शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.

Story img Loader