Maharashtra Election 2024 Yogi Adityanath Fact Check Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचितसह सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जाऊन तर कुठे प्रचार सभांच्या माध्यमातून लोकांना मतदानाचे आवाहन करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरही उमेदवारांच्या प्रचाराबाबतचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका भाजपा उमेदवाराच्या प्रचाराचा एक व्हि़डीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले, ज्यात दोन लोक जेसीबीवर उभे राहून प्रचार करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात बुलडोझर घेऊन भाजपाच्या एका उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा दावा केला आहे. पण, खरंच योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात बुलडोझर घेऊन भाजपाच्या कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं, ते सत्य नेमकं काय जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर मनोज कुमारने त्याच्या प्रोफाईलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर केला आहे.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

इतर एक्स युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला एक्सवर एक पोस्ट आढळली, ज्यामध्ये असे सुचवले होते की, त्या व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांचा पोशाख घातला होता.

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनेलवर आम्हाला एक व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडला.

एका भाजपा आमदाराने प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारखा हुबेहूब दिसणारा डुप्लिकेट व्यक्ती आणल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. तसेच वृत्तानुसार हा व्हिडीओ महाराष्ट्रातील अकोला येथील आहे.

त्यानंतर आम्ही अकोला येथील पत्रकार करुण भांडारकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की, व्हिडीओमधील भाजपा आमदार मूर्तिजापूर येथील हरीश पिंपळे आहेत.

त्यानंतर आम्हाला एका स्थानिक न्यूज पोर्टलवर त्यांच्या JCB स्टंटची बातमी मिळाली.

https://www.ucnnews.live/politics/after-yogi-adityanath-s-rally-in-murtijapur-candidate-harish-pimpale-s-jcb-stunt-is-being-widely-discussed-1730957314826

बातमीत स्पष्ट लिहिण्यात आले होते की, व्हिडीओत दिसणारी व्यक्ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाही, त्या व्यक्तीने केवळ योगी आदित्यनाथ यांच्यासारखा पोशाख घातला आहे.

त्यानंतर आम्ही हरीश पिंपळे यांच्याशी फोनवर संपर्क साधला, यावेळी भाजपाचे दुसरे कार्यकर्ते जोगदंड गुरुजी आमच्याशी बोलले. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मूर्तिजापूरमध्ये जाहीर भाषणानंतर जेसीबी स्टंट रॅली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जोगदंड गुरुजींनी आम्हाला माहिती दिली की, योगी आदित्यनाथ यांच्या वेशात दिसणारी व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता होता. घटनास्थळी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे हा प्रकार घडला.

अकोल्यातील लोकसत्ताचे प्रतिनिधी प्रबोध देशपांडे यांनी माहिती दिली की, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घातलेल्या व्यक्तीचे नाव संतोष धुळे असून तो मूर्तिजापूर येथील भाजपृचा कार्यकर्ता आहे.

हेही वाचा – “गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा-महायुतीला मतदान करा” महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान पोस्टर व्हायरल? पोस्टरमधील दावा खरा की खोटा? वाचा

हरीश पिंपळे हे भाजपाकडून अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

निष्कर्ष :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात बुलडोझरवरून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही. तसेच जेसीबीवरील दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती भाजपा आमदार आणि मूर्तिजापूरचे उमेदवार हरीश पिंपळे आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेली दुसरी व्यक्ती योगी आदित्यनाथ नसून त्यांच्यासारखा दिसणारा भाजपा कार्यकर्ता संतोष धुळे हा आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader