Maharashtra CM Eknath Shinde Fact Check Photo : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला, यानंतर ते आता महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. याचदरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक फोटो खूप व्हायरल होत असल्याचे आढळून आले. यात एक व्यक्ती ऑटो रिक्षासमोर उभी असल्याचे दिसत आहे, जी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदेंचा हा फार जुना फोटो असल्याचे म्हटले जात आहे. पण, खरंच या फोटोतील व्यक्ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे का, या विषयी जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर हरकेश नागरवालने भ्रामक दाव्यासह व्हायरल फोटो शेअर केला आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

इतर युजर्सदेखील भ्रामक दाव्यांसह तोच फोटो शेअर करत आहेत.

तपास:

फोटोचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही आमचा तपास सुरू केला. यावेळी फोटोत दिसत असलेल्या ऑटो रिक्षाची नंबर प्लेट ‘MH 14 8172’ अशी दिसत आहे.

त्यानंतर आम्ही ‘MH 14’ हा कोड कुठून आला आहे ते तपासले. आरटीओ वाहन नोंदणी तपशिलानुसार, ‘MH-14’ हा कोड महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमधील असून ते पुण्यात आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे ठाणे, नवी मुंबई येथील असल्याची नोंद घ्यावी.

https://www.drivespark.com/rto-vehicle-registration-details/maharashtra-mh-14/

त्यानंतर आम्ही फोटोवर Google रिव्हर्स इमेज सर्च केले. यावेळी आम्हाला फेसबुकवर महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणेची एक पोस्ट आढळली.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हा फोटो १९९७ मधील महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक बाबा कांबळे यांचा आहे. रातराणी रिक्षा स्टँडवर त्यांनी त्या रिक्षाची पूजा केल्यानंतर तो फोटो क्लिक केला होता.

मग आम्ही बाबा कांबळे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “पिंपरी चिंचवड, पुणे येथील रातराणी रिक्षा स्टँडवर १९९७ मध्ये श्रावण महिन्यात आम्ही पूजा केल्यानंतर हा फोटो काढला होता. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मला विचारले होते की, फोटोत चित्रात दिसत असलेली व्यक्ती मीच आहे का? तेव्हा मी हो म्हणताच त्यांनी स्पष्टीकरण दिले होते की, लोक हा फोटो एकनाथ शिंदे यांचा असल्याचा समजून शेअर करत आहेत. बाबा कांबळे हे आता कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

निष्कर्ष :

व्हायरल फोटोमध्ये रिक्षासमोर उभी असलेली व्यक्ती माजी मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीत. ते कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे आहेत, ते या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसारखे दिसतात. त्यांचा हा फोटो १९९७ मध्ये काढण्यात आला होता. त्यामुळे सोशल मीडियावर या फोटोसंदर्भात केले जाणारे दावे दिशाभूल करणारे आहेत.