Kolhapur Accident Hit And Run video: काही दिवसांपासून देशभरात हिट ॲण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट ॲण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. देशभर गाजलेल्या पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणाची आता कोल्हापूरमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. कोल्हापूरमधलं असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे, हा व्हिडीओ मन सुन्न करणारा आहे.

स्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. कोल्हापुरातील उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंडस्ट्रीज कंपनीबाहेर कामावर जात असताना तरुणाला भरधाव कारने मागून धडक दिली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या तरुणाचा अपघात झाला,त्या ठिकाणी काही पाऊलांवरच त्याची कंपनी होती. तो फक्त गेट उघडून आत शिरणारच होता, पण काही मिनिटांच्या या खेळात त्याचा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भयंकर होती की तरुण थेट हवेत उंच उडाला. कोल्हापूरजवळील उंचगाव या गावात ही घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. गांधीनगर पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
a girl ride met an accident after a guy appreciate her as a good rider
पापाच्या परीचं कौतुक करताच धाडकन आपटली; VIDEO होतोय व्हायरल

अपघाताचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या सुमारास एक तरुण रस्त्यावरुन घरी जात असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळही तशी कमीच आहे. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना धडक दिली. कारची धडक इतकी भयंकर होती की तो थेट हवेत उडला. या अपघातात तरुणाचे नेमके पुढे काय झालं? याबाबत माहिती समोर आली नसून व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मेहुणी शेर तर भाओजी सव्वा शेर; नवरदेवानं भर मांडवात केला मेहुणीचा पचका, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @Diwakar_singh31 नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोकं वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Story img Loader