“पेपर कसा गेला ?, नीट लिहिलास ना ? कसलाही ताण न घेता चांगली परीक्षा दे.” परीक्षेला जाताना बाबा नेहमीच आपुलकीचा सल्ला आपल्या लेकीला द्यायचे. पण परीक्षा निम्म्यावर असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेच्या वेळी दु:खाचा डोंगर निकितावर कोसळला. परीक्षेला अवघे काही तास असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. मात्र अशाही परिस्थितीत निकिताने बारावीची परीक्षा दिली. आणि ८९ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं. यश मिळवल्यानंतर पाठीवर शाबासकीची थाप टाकायला मात्र बाबा या जगात नव्हते याचे दु:ख मात्र तिला बोचत राहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : शेतात दिवसभर राबूनही ‘त्या’नं दहावीत मिळवले ९४.६%

औरंगाबाद येथील जयसिंगपुरा परिसरातील पराक्रम कॉलनीत निकिता पांडे आणि तिचे कुटुंबीय राहतात. वडील राजेंद्र पांडे यांचं मेडिकल स्टोअर होतं. आई गृहिणी आहे. तर मोठा भाऊ आयआयटी पवई इथं शिक्षण घेतोय. तर निकिताने विद्याधाम ज्युनियर कॉलेजमधून बारावी सायन्स शाखेची परीक्षा दिली. निकिताचा इलेक्ट्रॉनिक विषयाचा शेवटचा पेपर होता. मात्र त्या अगोदर पहाटे ह्रदयविकाराचा झटका आल्याने निकिताचे वडील राजेंद्र पांडे यांचा मृत्यू झाला. घरात वडिलांचा मृतदेह होता. काय करावं हे सुचत नव्हतं. वडिलांनी तिच्याकडून जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण करण्यासाठी तिनं परीक्षा देणं गरजेचं होतं. एवढ्या कठीण परिस्थितीत कोणीही खचून गेलं असतं पण निकिता मात्र खचली नाही. मोठ्या धैर्याने आणि जिद्दीने तिने परीक्षा दिली. वडील या जगात नाही आहेत याचं दु:ख मोठ्या हिंमतीने तिने पचवलं आणि परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवत यश संपादन केलं. निकाल लागल्यावर “बाबा आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. पाठीवर शाबासकीची थाप टाकायला ते हवे होते.” असं म्हणत निकिताच्या डोळ्यात पाणी आलं, पण बाबांचं स्वप्न मला पूर्ण करायचंय म्हणत तिने स्वत:ला सावरलं.

वाचा : कॅन्सरशी लढा देणाऱ्या त्या विद्यार्थिनीने ICU मध्ये पाहिला बारावीचा निकाल