‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. या परीक्षेत राज्यातून पहिले आले त्या सगळ्यांचेच अभिनंदन! परीक्षेत यश मिळावे यासाठी सगळ्या मुलांनी दिवसरात्र मेहनत घेतली. यातले अनेक विद्यार्थी असेही होते ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष सुरू होता. कोणाची घरची परिस्थिती हालाखीची होती, तर कोणी दिवसा काम करून रात्री अभ्यास करत होतं. या प्रत्येकांच्या कथा या प्रेरणादायीच आहेत म्हणून प्रत्येकाने त्यांच्याकडून काहीना काही शिकले पाहिजे आणि अशाच प्रेरणादायी कथेपैकी एक आहे ती वरळीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या स्नेहा अरीची कथा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : कॅन्सरग्रस्त मुलाने बारावीत मिळवले ९५ % गुण

तिच्या वयाची मुलं बारावीनंतर काय करायचं? कोणतं करिअर निवडायचं? या भविष्याच्या विचारात अडकले असताना स्नेहा मात्र आयसीयूमध्ये कॅन्सरशी लढते आहे. दोन वर्षांपूर्वीच तिला कॅन्सर झाल्याचे समजले. स्नेहाची प्रकृतीही नाजूक आहे, आपला बारावीचा निकालही तिला रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये समजला. स्नेहाला पेपर लिहिताना त्रास होत होता, पण कोणत्याही मदतनीसाशिवाय तिने आपला पेपर पूर्ण केला. तिला बारावीत ६० टक्के गुण मिळाले. कदाचित अनेकांसाठी ६० टक्के जास्त वाटतही नसतील. पण अशाही परिस्थितीत तिने एवढे गुण मिळवले हे कौतुकाची गोष्ट आहे. ‘मी माझे शंभर टक्के देऊ शकले नाही, पण निकालाने मी खूश आहे अशी प्रतिक्रिया तिने ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना दिलीये.

वाचा : जुळ्या बहिणींना बारावीच्या परीक्षेत गुणही अगदी ‘सेम टू सेम’

स्नेहाला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण तिची प्रकृती पाहता तिला पुढे एवढा अभ्यास कसा जमेल असा प्रश्न तिच्या बाबांना पडला आहे. स्नेहाच्या वडिलांची तीन वर्षांपूर्वीच नोकरी गेली. पण स्नेहाला शिकवण्याची जिद्द काही त्यांनी सोडली नाही. जवळपासच एखादं कॉलेज शोधून स्नेहाला शिकवण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं आहे.

वाचा : दोन्ही हात नसतानाही तिने बारावीत मिळवले ६३% गुण