Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातले काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. आपल्याला माहितीच आहे, शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर कचरा उघड्यावर टाकतात. अनेक नागरिक नेहमीच उघड्यावर कचरा टाकतात. एवढंच नाहीतर एखाद्या पर्यटन स्थळीसुद्धा काही मंडळी कागद, खाऊन झालेले पुढे, प्लॅस्टिक उघड्यावर टाकतात. कधी कधी आपण बाहेर गेल्यावर पाण्याची बाटली बाहेरुन विकत घेतो, मात्र पाणी पिऊन झाल्यावर बॉटल रस्त्यावरच टाकतो. काहीवेळा मुक्या प्राण्यांना चूक बरोबर गोष्टी कळतात पण माणसांना कळत नाही. याचंच एक उदाहरण आता समोर आलं आहे. एका बेजबाबदार पर्यटकांला ताडोबातील नयनतारा वाघिणीने अद्दल घडवली आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल.

महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील ताडोबा हे वाघ प्रकल्प वाघांचा दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. इथे लाखो पर्यटक वर्षभरात वाघाचे दर्शन घेण्यास येत असतात. जंगलातील वन्यप्राण्यांना प्लास्टिकसह अनेक वस्तूंचा त्रास होतो हे आपल्या माहिती आहे. तरीदेखील बेजबाबदार पर्यटक आजही सरार्स ते सोबत घेऊन जातात. प्लास्टिकमुळे आपल्या निसर्गाला कायम धोका आहे हे आपल्याला माहित असताना सुद्धा आपण सरास प्लास्टिकचा वापर करत असतो. माणसांप्रमाणेच प्राण्यामध्येही तेवढीच समज असते अस आपण अनेकवेळा बोलतो. हेच या वाघीणीच्या कृतीतून सिद्ध झालं आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

नयनताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कोणीतरी प्लास्टिकची पाण्याची बाटल जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यातील फेकून दिली होती. नयनतारा तिथे आली आणि तिने पाण्यातून ती बाटल काढली आणि तिथेतून ऐटीत निघून गेली. जणू काही तिने आपल्या घरातील घाण साफ केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हैद्राबादमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; मालकासमोर लाखो रुपयांचे दागीने केले लंपास, VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @Deep Kathikar यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो लाइक्स आणि प्रतिक्रिया आल्या आहेत.

Story img Loader