ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधासभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गोंधळानंतर गैरवर्तवणूकीचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करत असल्याची घोषणा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. या आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे. मात्र या आमदारांना निलंबित करण्यावरुन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सभागृहात बरीच चर्चा झाली. फडणवीस यांनी आपली बाजू मांडली तर जाधव यांनी आपण निर्णय दिला असून पुढे सरकारने ठरवावं असं म्हणत निलंबनाची घोषणा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ अर्धा तास संवाद सुरु होता. मात्र आमदार निलंबनाचा इतिहास पाहिल्यास यापूर्वी आज तालिका अध्यक्ष असणारे भास्कर जाधव आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे नरहरी जिरवाळ हे तिघेही अशाचप्रकारे निलंबित झालेले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा